Home देश-विदेश ३०० पेक्षा अधिक लहान मुले वर्ल्ड रेकॉर्डसाठी उतरणार

३०० पेक्षा अधिक लहान मुले वर्ल्ड रेकॉर्डसाठी उतरणार

8 second read
0
0
33

no images were found

३०० पेक्षा अधिक लहान मुले वर्ल्ड रेकॉर्डसाठी उतरणार

कोल्हापूर : बाल कलाकारांना चांगले व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, हा उद्देश समोर ठेवून येत्या ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये कोल्हापूरात ‘लोक संस्कृतीच्या रंगछटा’ अशा भव्यदिव्य वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धेचे थिंकर फौंडेशन ऑफ इंडिया आणि नटराज डान्स स्टुडिओ कोल्हापूर यांच्या संयुक्तविद्यमाने स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये सुमारे ३०० पेक्षा अधिक लहान मुले वर्ल्ड रेकॉर्डसाठी उतरणार आहेत. साधारणपणे ५ ते १३ वयोगटातील मुला-मुलींचा समावेश असेल. या स्पर्धेच्या परिक्षणासाठी वर्ल्ड रेकॉर्ड बुककडून तज्ज्ञ परिक्षकांची टिम येणार आहे. कोल्हापूरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बाल कलाकारांनी सहभागी व्हावे. स्पर्धेतील सहभागी कलाकारांना वर्ल्ड रेकॉर्ड बुक कडून प्रमाणपत्र, मेडल दिले जाणार आहे, अशी माहिती नटराज डान्स स्टुडिओ चे संस्थापक नृत्यदिग्दर्शक अक्षय कदम यांनी दिली. यावेळी मिसेस इंडिया राजेश्वरी मोटे, थिंकर फौंडेशन ऑफ इंडिया महाराष्ट्राचे प्रेसिडेंट उत्तम मांढरे, महाराष्ट्र स्टाईल आयकॉन रेणुका केकतपुरे, समुपदेशक अभिषेक यादव, महाराष्ट्र पोलीस मित्र समिती शहर सचिव कल्याणी निरुके आदी उपस्थित होते.

नटराज डान्स स्टुडिओच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये समर डान्स कॅम्प, गर्बा दाडिंया वर्कशॉप, झुंबा वर्कशॉप, मुव्ही अ‍ॅण्ड सिरीयल ऑडिशन, सर्व प्रकारचे डान्स वर्कशॉप, अ‍ॅक्टींग वर्कशॉप यासह विविध प्रकारचे वर्कशॉप राबविले जात आहेत.
‘लोक संस्कृतीच्या रंगछटा’ वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धेसोबतचं मराठ्यांच्या शौर्यगाथेमधील एक अविस्मरणीय नाव ‘रणरागिनी’ व ‘क्वीन ऑफ झांसी’ मणिकर्णिका. त्यांनी रणांगणात आपले शौर्य गाजवले. आणि त्याच धर्तीवर आपल्या रणरागिणींनी देखील कलाक्षेत्रात वैविध्यपूर्ण शौर्य गाजवत आहेत. अशा रणरागिणींनचा थिंकर फौंडेशन ऑफ इंडिया आणि नटराज डान्स स्टुडिओच्या वतीने ‘मणिकर्णिका-द किवन ऑफ झांसी हा जागतीक स्तरावरील पुरस्कार देवून सन्मानित करणार आहोत. त्यामध्ये सौदर्य सम्राज्ञी व संस्कार शिदोरी मंच च्या संस्थापक अध्यक्ष स्मिता खामकर ( कोल्हापूर), दिवा मिसेस महाराष्ट्र गृहलक्ष्मी २०१८ च्या विजेत्या स्वप्नाली जगोजे (कोल्हापूर), मिसेस महाराष्ट्र २०१८ राजनंदिनी पत्की (कोल्हापूर), श्रीलंका येथे झालेल्या मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल २०१६ विजेत्या मृणाल गायकवाड (पुणे), मिसेस इंडिया इंटरनॅशनल २०१७ च्या विजेत्या शुभांगी शिंत्रे (इचलकरंजी-कोल्हापूर), प्रसिद्ध सिनेअभिनेत्री पद्मश्री हेमामालिनी यांच्यासोबत २०१५ पासून सादरीकरणात सहभागी असलेल्या कथक-भरतनाट्यम विशारद भाग्यश्री कालेकर (कोल्हापूर) यासह चित्रपट, मॉडेलिंग, डान्स, अ‍ॅक्टींग, फॅशन क्षेत्रातील कलाकारांचा समावेश आहे. या वर्ल्ड पुरस्काराचे स्वरुप कोल्हापुरी फेटा, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान बहाल केला जाणार आहे. यामध्ये मॉडेलिंग सौदर्य स्पर्धा विजेते १५ अवॉर्ड, अ‍ॅक्टर, सिंगर डान्सर ५ अवॉर्ड आणि कलाक्षेत्रातील वैविध्यपूर्ण कामगिरीबद्दल ५ अवॉर्ड अशा वर्गवारीमध्ये हे विशेष सन्मान केले जाणार आहेत.
कोल्हापूरात होणाऱ्या ‘लोक संस्कृतीच्या रंगछटा’ या वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धेसाठी जास्तीत जास्त बाल कलाकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन थिंकर फौंडेशन ऑफ इंडिया आणि नटराज डान्स स्टुडिओतर्फे अक्षय कदम यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In देश-विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…