no images were found
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त १५ जुलै रोजी मार्गदर्शन सत्र
कोल्हापूर : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त दिनांक १५ जुलै २०२३ रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, विद्याप्रबोधिनी कोल्हापूर व ज्योती कॉम्प्युटर सर्व्हिसेस, यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विषयक मार्गदर्शन सत्राचे आयोजन विद्याप्रबोधिनी, आर्हम प्लाझा, शहाजी लॉ कॉलेज समोर, शाहूपुरी ४ थी गल्ली, कोल्हापूर येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचा जास्तीत जास्त युवक- युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
शिबिरामध्ये कौशल्य विषयक कोर्सेस बाबतची माहिती व विविध क्षेत्रातील मान्यवरांची कौशल्य विषयक मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विद्याप्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष राहुल चिकोडे, इनोव्हेशन अँम्बॅसडोर आणि MAARG स्टार्टअप इंडियाचे सदस्य हर्षवर्धन पंडित यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या मार्गदर्शन सत्रास अधिकाधिक युवक- युवतींनी उपस्थित रहावे, अधिकार माहितीसाठी 0231-2545677 या दुरध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा