no images were found
पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांची मेडिकल कॉलेजला सदिच्छा भेट
कोल्हापूर: डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक आणि पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील यांनी शुक्रवारी कदमवाडी येथील डी. वाय पाटील मेडिकल कॉलेजला सदिच्छा भेट दिली. यावेळी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या कामकाजाचा आढावा घेऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांनी 1984 मध्ये कसबा बावडा येथे डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज स्थापना केली. त्यानंतर गेल्या ४० वर्षात डी. वाय. पाटील ग्रुपचा प्रचंड मोठा विस्तार झाला आहे. देशातील गुणवत्तापूर्ण उच्चशिक्षण देणारी सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून डी वाय पाटील ग्रुपची ओळख निर्माण झाली आहे.
ग्रुपचे संस्थापक डॉ. डी. वाय. पाटील यांनी मेडिकल कॉलेजला भेट देऊन येथील कामकाजाचा आणि प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांचे पुत्र डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमार्फत राबवल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. हॉस्पिटलमध्ये गेले वर्षभर सर्व रुग्णांची मोफत तपासणी व उपचार केले जात असल्याबद्दल डॉ. डी. वाय. पाटील यानी समाधान व्यक्त केले.
कुलपती डॉ. संजय डी पाटील यांच्या संकल्पनेतून कदमवाडी येथे साकारत असलेल्या डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या २३ मजली भव्य इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. या कामाबाबतची माहिती डॉ. डी. वाय. पाटील यांनी घेतली. तसेच या कामासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. या हॉस्पिटलचा वापर जास्तीत जास्त गरजवंत आणि गरीब रुग्णांना व्हावा यासाठी डॉ. संजय डी. पाटील करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करून सामजिक हेतूने हे काम असेच चांगल्या पद्धतीने सुरु ठेवण्याचा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, उपप्राचार्या डॉ. आशालता पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सुहासिनी राठोड, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे, फ़िजिओथेरपीच्या प्राचार्य डॉ. अमृत कुवर रायजादे, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, यांच्यासह विविध महाविद्यालयांचे विभाग प्रमुख, डॉक्टर, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी
कदमवाडी: पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना मेडिकल कॉलेजच्या नव्या इमारतीच्या बांधकामाबाबत माहिती देताना डॉ. संजय डी. पाटील. समवेत डॉ. राकेश कुमार शर्मा.
कदमवाडी: पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे स्वागत करताना डॉ. राकेश कुमार शर्मा. समवेत डॉ. संजय डी. पाटील, संजय जाधव, अजित पाटील आदी.