
no images were found
निमिषा वखारिया साकारणार शक्तीच्या रंगील्या गुजराती चाचीची भूमिका
प्यार का पहला नाम राधा मोहन, तेरी मेरी इक जिंदरी आणि रब से है दुआ यासारख्या देशभरातील प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंत केलेल्या मालिकांनंतर ‘झी टीव्ही’ वाहिनी ‘स्टुडिओ एलएसडी प्रॉडक्शन्स’ या संस्थेच्या सहकार्याने ‘प्यार का पहला अध्याय शिव शक्ती’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहे. मालिकेतील शिव आणि शक्ती यांच्या मध्यवर्ती भूमिका अनुक्रमे अर्जुन बिजलानी आणि निक्की शर्मा साकारणार आहेत. या मालिकेच्या पहिल्याच प्रोमोने अनेक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेत अनेक नामवंत कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याने ही मालिका पाहण्याची उत्कंठा प्रेक्षकांमध्ये वाढत चालली आहे.
मालिकेतील नामवंत कलाकारांच्या नावांच्या यादीत आणखी काही नावांची भर पडली आहे. आता टीव्हीवरील नामवंत आणि लोकप्रिय कलाकार निमिषा वखारिया यांची एका रंगील्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. त्या या मालिकेत मनोरमा नावाच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहेत. मालिकेतील शक्तीच्या काकूची ही भूमिका असेल. ती सर्वांवर हुकुमत गाजविणारी, तोंडावर स्पष्टपणे फाडफाड बोलणारी काकू आहे. किंबहुना त्यांच्या आगमनामुळे मालिकेच्या कथानकाला अनेक नवी वळमे मिळण्याची अपेक्षा आहे.
निमिष वखारिया म्हणाल्या, “प्यार का पहला अध्याय शिव शक्ती या धडाकेबाज मालिकेत मला मनोरमासारखी व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळत असल्याबद्दल मी थरारून गेले आहे. ती एक रंगील्या स्वभावाची गुजराती स्त्री असून तिच्या आगमनानंतर मालिकेत धमाल निर्माण होईल. घरात तिचाच हुकुम चालतो… एक आई असल्याने ती सर्वप्रथम आपल्या मुलांची काळजी घेते. कारण तिची पुतणी शक्तीची जबाबदारी तिच्यावर लादण्यात आलेली असते.”