
no images were found
दूसरी माँ’ने साजरा केला २०० एपिसोड्सचा महत्त्वपूर्ण टप्पा
साजरीकरणाची वेळ आली आहे, कारण एण्ड टीव्हीवरील मालिका ‘दूसरी माँ’ने २०० एपिसोड्सचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. गेल्या वर्षी सुरू झालेली मालिका उत्तरप्रदेशमध्ये पती, दोन मुली व सासरच्या माणसांसोबत राहणाऱ्या महिलेच्या कथेला सादर करते. ती आणि तिचा पती नकळतपणे पतीच्या अवैध मुलाला दत्तक घेतात आणि त्यांच्या आनंदी व शांतमय कौटुंबिक जीवनामध्ये उहापोह निर्माण होतो. या हृदयस्पर्शी कौटुंबिक मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि टीव्हीवरील त्यांची आवडती मालिका बनली आहे. स्टार कलाकार नेहा जोशी (यशोदा), आयुध भानुशाली (कृष्णा), मोहित डागा (अशोक) व दर्शन दवे (रणधीर शर्मा) या आनंदी क्षणाला साजरे करण्यासाठी आणि २०० एपिसोड्सचा उल्लेखनीय प्रवास शेअर करण्यासाठी एकत्र आले. २०० एपिसोड्स पूर्ण झाल्याबाबत यशोदाची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशी म्हणाल्या, ‘‘मालिका ‘दूसरी माँ’मध्ये यशोदाची भूमिका साकारण्याचा माझा प्रवास अद्भुत राहिला आहे. यासाठी मी माझी टीम आणि प्रेक्षकांचे प्रेम व पाठिंब्याकरिता आभार मानते. यशोदा घराघरामध्ये लोकप्रिय बनली आहे आणि कृष्णा (आयुध भानुशाली) व तिच्यामधील नात्याने टीव्हीवरील आई-मुलाच्या जोडीसाठी नवीन ट्रेण्ड स्थापित केला आहे. इम्तियाज जी आणि अमिताभ जी यांचे खूप खूप आभार कारण या मालिकेने मला अनेक भावनांच्या रोलरकोस्टरवर नेले आहे आणि आम्ही इथवर पोहोचल्याचा मला खूप आनंद होत आहे. ही उपलब्धी आम्हाला प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहण्यास आणि अधिकाधिक नव्या उंचीवर पोहोचण्यास प्रेरित करते. असे सेलिब्रेशन कायम सुरू राहो!’’ कृष्णाची भूमिका साकारणारा आयुध भानुशाली म्हणाला, ‘‘हा आम्हा सर्वांसाठी खास क्षण आहे! आम्ही २०० एपिसोड्सचा टप्पा पूर्ण केल्याचा मला खूप आनंद होत आहे. हा प्रवास अद्भुत राहिला आहे आणि आम्ही एक कुटुंब बनलो आहोत. या अविश्वसनीय उपलब्धीसाठी टीममधील सर्वांचे अभिनंदन!’’