no images were found
ड्रीम रोल (स्वप्नवत भूमिका)!
प्रत्येक कलाकार मनोरंजन क्षेत्रात यशस्वी ठरण्यासाठी प्रयत्न करतो. मान्यता व प्रसिद्धी मिळण्याव्यतिरिक्त त्यांची त्यांचे व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या विविध भूमिका साकारण्याची इच्छा असते. याबाबत सांगताना एण्ड टीव्हीचे काही कलाकार त्यांच्या स्वप्नवत भूमिकांबाबत, तसेच कधीतरी त्या भूमिकांना प्रत्यक्ष पडद्यावर साकारण्याच्या इच्छेबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत दर्शन दवे (रणधीर शर्मा, ‘दूसरी माँ’), चारूल मलिक (रूसा, ‘हप्पू की उलटन पलटन’) आणि लीना गोयंका (डिम्पल, ‘भाबीजी घर पर है’). मालिका ‘दूसरी माँ’मध्ये रणधीर शर्माची भूमिका साकारणारे दर्शन दवे म्हणाले, ‘‘माझ्यामधील कलाकाराचे प्रबळ, लक्षवेधक व वास्तविक भूमिका लक्ष वेधून घेतात, ज्या प्रेक्षकांशी संलग्न होण्यासह त्यांच्या मनात स्थान निर्माण करू शकतात. असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की मला नुकतेच एण्ड टीव्हीवरील मालिका ‘दूसरी माँ’मध्ये अशीच एक भूमिका – रणधीर शर्माची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
आपल्या विविध शैलींसह रणधीर प्रेक्षकांना त्यांच्या आसनांवर खिळवून ठेवेल, ज्यामुळे ही भूमिका अत्यंत रोचक व परिपूर्ण आहे. माझ्या अभिनय करिअरमध्ये मी विविध भूमिका साकारल्या आहेत आणि प्रत्येक भूमिका उल्लेखनीय आहे. जयपूरचा असल्यामुळे माझ्या इतिहासाप्रती सखोल आवडीने मला ऐतिहासिक प्रकल्पांमध्ये सहभाग घेण्यास प्रेरित केले. रूपेरी पडद्यावर बाजीराव सारखी भूमिका साकारण्याची संधी निश्चितच माझी स्वप्नवत भूमिका आहे. अशा व्यक्तिमत्त्वामध्ये सामावून जाणे आव्हानात्मक व उत्साहवर्धक आहे. त्यांच्या भूमिकेमध्ये सामावून जाऊन त्यांची भाषाशैली समजून घेण्याचा प्रवास उत्साहवर्धक असेल. अधिक पुढे जात मी यासारख्या भूमिका साकारण्यास आणि त्यांच्या कथा पडद्यावर सादर करण्यास उत्सुक आहे.’’
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील चारूल मलिक ऊर्फ रूसा म्हणाल्या, ‘‘प्रेक्षकांशी संलग्न होणाऱ्या भूमिकांचा शोध घेत असताना माझ्यासाठी एक भूमिका मोहकता व प्रेमळ स्वभावाचे प्रतीक ठरली, ती म्हणजे इम्तियाज अली यांचा चित्रपट ‘जब वी मेट’मधील गीत. अली यांच्या निपुण दिग्दर्शनांतर्गत करीना कपूरने उत्तम अभिनयासह या भूमिकेमध्ये उत्साहाची भर केली. मी हा चित्रपट किती वेळा पाहिला आहे हे देखील मला माहित नाही. मला गीत खूप आवडते. चित्रपट व या भूमिकेने आपल्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. हा चित्रपट सर्व पिढ्यांशी संलग्न असल्यामुळे त्याची जादू कायम आहे. गीतचा वैविध्यपूर्ण उत्साह, उत्साहपूर्ण ऊर्जा आणि आपल्या चेहऱ्यावर हास्य आणण्याची क्षमता हे सर्व गुण खडतर काळात उपयुक्त ठरतात. भविष्यात गीतसारखी भूमिका साकारण्याची संधी मिळाली तर ती आदर्श भूमिका ठरेल. अशी सखोलता असलेल्या भूमिकेमध्ये सामावून जाणे, प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणे व त्यांच्यावर दीर्घकालीन प्रभाव निर्माण करणे निश्चितच सन्माननीय आणि स्वप्न सत्यात अवतरल्यासारखे असेल. गीतची भूमिका कथानकाची क्षमता, तसेच भूमिकांची प्रेक्षकांसोबत कनेक्शन निर्माण करण्याची क्षमता सार्थ ठरवते.’
’ मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील लीना गोयंका ऊर्फ डिम्पल म्हणाल्या, ‘‘मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये डिम्पलची भूमिका साकारण्याचे स्वप्न पाहिले नसले तरी माझ्यासाठी ते स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. मालिकेची निस्सीम चाहती असल्यामुळे मी या संधीसाठी आभार व्यक्त करते. पण, माझी प्रामाणिक पोलिस अधिकारीची भूमिका साकारण्याची महत्त्वाकांक्षा आहे. चित्रपट ‘मर्दानी’मध्ये राणी मुखर्जीने साकारलेली भूमिका माझी रूपेरी पडद्यावर साकारण्याची इच्छा असलेल्या भूमिकेशी परिपूर्णपणे जुळते. असे प्रभावी व्यक्तिमत्त्व, इतरांचे संरक्षण व जीवन वाचवण्याप्रती अविरत निर्धार लक्षवेधक आहे. मी पोलिस दलामध्ये कार्यरत असलेल्या सर्व पोलिसांच्या अतूट उत्साहाचे कौतुक करते. त्यांची समर्पितता व त्याग मला प्रेरित करतात आणि माझी प्रेक्षकांशी संलग्न होणाऱ्या भूमिकेच्या माध्यमातून त्यांच्या साराला सादर करण्याची, तसेच प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्याची इच्छा आहे.’’