
no images were found
मोदी @9 जनसंपर्क अभियांचा प्रारंभ
कोल्हापूर : देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकालाला नऊ वर्षपूर्तीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात मोदी @9 महाजनसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. याच धर्तीवर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूर उत्तर विधानसभा क्षेत्रामध्ये जनसंपर्क अभियानाचा प्रारंभ उभा मारुती चौक छत्रपती शिवाजी पेठ या ठिकाणापासून करण्यात आला. याप्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, उत्तर विधानसभा प्रमुख सत्यजित नाना कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
आज शिवाजी पेठे मधील संध्यामठ गल्ली परिसरामध्ये भाजपा प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हे अभियान राबवण्यात आले. 90 90 90 2024 या फोन क्रमांक वर मिस कॉल देऊन पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांना पाठिंबा दर्शवण्याचे आवाहन याप्रसंगी सर्वांना करण्यात आले.
संपूर्ण देशभरात 20 जून ते 30 जून या कालावधीत हे महाजन संपर्क अभियान सुरू होत असून पंतप्रधानांच्या यशस्वी नववर्ष कार्यकलामध्ये झालेल्या विकासाभिमुख कामांचा लेखाजोखा माहितीपत्रकाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा उद्देश असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केले. देशभरात 400 खासदार निवडणून आणन्याचा मोदींजींचा संकल्प असून या अभियानाच्या माध्यमातून या प्रक्रियेला सुरवात झाल्याचे नमूद केले.
याप्रसंगी विजय जाधव, चंद्रकांत घाटगे, हेमेंत आराध्ये, विजय सूर्यवंशी, विजयसिंह खाडे-पाटील,
राजसिंह शेळके, राजू पागर, विजयेंद्र माने, सुनील वाडकर, संग्राम जरग, प्रकाश सरनाईक, राजू जाधव,किरण नकाते, अद्वैत सरनोबत, गिरीश साळोखे, अप्पा लाड, डॉक्टर राजवर्धन, हर्षद कुंभोजकर, सुनील पाटील, अमेय भालकर, विवेक वोरा, राजू नरके, अजित सुरुवंशी, संजय सावंत, प्रकाश घाटगे, सचिन साळोखे, विजय दरवान, गायत्री राऊत, प्रभावती इनामदार, प्रमोदिनी हर्डीकर, भारती जोशी, किशोरी स्वामी, कोमल देसाई,
यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.