Home सामाजिक 100% इक्विटी गुंतवणूक पर्यायासह मार्केट लिंक्ड रिटायरमेंट बचत योजना

100% इक्विटी गुंतवणूक पर्यायासह मार्केट लिंक्ड रिटायरमेंट बचत योजना

19 second read
0
0
26

no images were found

100% इक्विटी गुंतवणूक पर्यायासह मार्केट लिंक्ड रिटायरमेंट बचत योजना

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने ‘आयसीआयसीआय प्रू सिग्नेचर पेन्शन’ लाँच केले आहे, हा एक मार्केट लिंक्ड पेन्शन प्रोडक्ट आहे जे ग्राहकांना कमी खर्चात आणि टॅक्स बचतीसह कार्यक्षम रिटायरमेंट फंड तयार करण्यास मदत करते. आर्थिक स्थिरता राखण्यासाठी रिटायरमेंटचे नियोजन महत्त्वाचे आहे. हे यूनिक प्रोडक्ट ग्राहकांना रिटायरमेंटसाठी बचत आणि उत्पन्न वाढीच्या दोन्ही टप्प्यांसाठी नियोजन करण्यास मदत करते.

श्री. अमित पाल्टा, चीफ डिस्ट्रिब्युशन ऑफिसर, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स लॉन्चची घोषणा करताना म्हणाले, “आम्हाला आमचा मार्केट लिंक्ड पेन्शन प्रोडक्ट, आयसीआयसीआय प्रू सिग्नेचर पेन्शन लाँच करताना आनंद होत आहे, यामुळे ग्राहकांना त्यांचा रिटायरमेंट फंड तयार करण्यासाठी मदत होईल जेणेकरून ते भारताच्या विकासात योगदान देऊ शकतील.

हे प्रोडक्ट ग्राहकांना इक्विटीमध्ये 100% गुंतवणूक करण्याची सुविधा देतो आणि जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी इक्विटी, डेट आणि बॅलन्स्ड फंड्समध्ये अमर्यादित फ्री स्विचेस देखील ऑफर करते. या प्रोडक्टसह आम्ही दोन नवीन फंड ‘आयसीआयसीआय प्रू पेन्शन इंडिया ग्रोथ फंड’ आणि ‘आयसीआयसीआय प्रू पेन्शन बॅलन्स्ड फंड’ देखील सादर करत आहोत.

आयसीआयसीआय प्रू सिग्नेचर पेन्शनमध्ये एक वैशिष्ट्य आहे जे ग्राहकांना त्यांचे उत्पन्न सुरू होण्याची तारीख ठरवण्यासाठी ‘अॅडव्हान्स’ किंवा ‘पोस्टपोन’ असे दोन पर्याय मिळतात. उत्पन्न सुरू होण्याच्या तारखेच्या ‘अॅडव्हान्स’ पर्यायाने व्यक्तींना रिटायरमेंटपूर्वीच उत्पन्न प्राप्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करता येते. याउलट ज्या ग्राहकांना रिटायरमेंट झाल्यावर उत्पन्न मिळवायचे आहे, ते उत्पन्न सुरू होण्याची तारीख पुढे ढकलण्याचा (पोस्टपोन’) पर्याय निवडू शकतात.

महत्त्वाचे म्हणजे, हे प्रोडक्ट ग्राहकांना पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यावर जमा झालेल्या बचतीच्या 60% पर्यंत टॅक्स-फ्री पैसे काढण्याची विशेष सुविधा देते आणि आजीवन उत्पन्नाची हमी सुनिश्चित करण्यासाठी उर्वरित रक्कम अॅन्युइटी खरेदी करण्यासाठी वापरली जाणे आवश्यक आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये आता नव्या प्रगत वैशिष्ट्यांची भर

टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये आता नव्या प्रगत वैशिष्ट्यांची भर &nb…