
no images were found
डी वाय पाटील अभियांत्रिकी ‘केमिकल’च्या 63 विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड
कोल्हापूर( प्रतिनिधी ) : कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्याल्याच्या केमिकल विभागाच्या ६३ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय रासायनिक कंपन्यामध्ये निवड झाली आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३ लाखापासून ९ लाखापर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.
केमिकल विभागाने आपली प्लेसमेंटची यशस्वी घोडदौड यंदाही कायम ठेवली आहे. सुजितकुमार माळी याची चिपळूण येथील एक्सेल इंडस्ट्री मध्ये वार्षिक ९ लाख रुपयांच्या पॅकेजवर निवड झाली आहे. त्याचबरोबर विरेन अवघडे याची वरली इंडिया लिमिटेड (५.१५ लाख), विद्या वाघमोडे हीची डी एक्स सी टेक्नॉलॉजीमध्ये (४.२ लाख) निवड झाली आहे. त्यांचबरोबर अन्य विद्यार्थ्याची एक्सेल इंडस्ट्री, वरली, डी एक्स सी टेक्नॉलॉजी, टीसीएस,दीपक नोवा, पिरॅमिड कन्सल्टन्सी, लक्ष्मी ऑरगॅनिक, राजदीप इंजीनियरिंग, चेक इंडिया लिमिटेड अशा अनेक नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
केमिकल इंजिनिअरिंग ही समाजाच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणारी अभियांत्रिकिमधील युनिव्हर्सल अशी शाखा आहे. लस, औषधे निर्मिती, प्लास्टिक, टेक्सटाइल, खते, सिमेंट, पेंटस, बि- बियाणे, तणनाशके, सुगंधी द्रव्ये निर्मिती, फूड टेक्नॉलॉजी इत्यादी मूलभूत गरजा पूर्ण करणारी शाखा असलेने केमिकल अभियंत्यांची मागणी उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्याना व्यक्तिमत्व विकास व प्लेसमेंटच्या दृष्टीने सातत्याने प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित केल्या जातात. या प्रशिक्षणाचा चांगला फायदा निवड झालेल्या विद्यार्थ्यांना झाला. विद्यार्थ्यांच्याकडून टेक्निकल नॉलेज, संभाषण कौशल्य व नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी केमिकल विभाग व महाविद्यालयाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. या निवडीसाठी महाविद्यालयाची ट्रेनिंग अँड ऑफिसर प्रा. सुदर्शन सुतार, हेड ट्रेनिंग प्रा. मकरंद काईंगडे, विभाग प्रमुख के. टी. जाधव, डॉ. अमरसिंह जाधव, डॉ. राहुल पाटील, डॉ. राहुल महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांनी अभिनंदन केले.