
no images were found
कोल्हापूर येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु
कोल्हापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, साईनाथ कॉलनी, कोल्हापूर वासतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थीनींसाठी सन 2023-24 शैक्षणिक वर्षाकरिता मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छुक विद्यार्थीनींनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, साईनाथ कॉलनी, कोल्हापूर या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल श्रीमती एस. ए. गडकरी यांनी केले.
यामध्ये 8 वी, 11 वी, व्यावसायिक महाविद्यालय, बिगर व्यावसायिक महाविद्यालयामध्ये कोल्हापूर शहर व परिसरातील प्रवेश घेऊ इच्छुक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय, इतर मागास व आर्थिकदृष्ट्या मागास, अपंग, अनाथ प्रवर्गातील विद्यार्थीनींना मोफत शैक्षणिक सोईसुविधा पुरविण्यात येतात. अधिक माहितीसाठी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, साईनाथ कॉलनी, जि. कोल्हापूर फोन नं. 0231-2680945, मोबाईल- 9823192026 संपर्क सधावा.