no images were found
दोनशे कोटी कामगारांचे भवितव्य जी-२० च्या निर्णयावर अवलंबून
दोनशे कोटी कामगारांचे भवितव्य जी-२० च्या निर्णयावर अवलंबून आहे. कारण आजही बहुतांशी कामगारांना सामाजिक सुरक्षा नाही. त्यांना ती मिळवून देण्याची संधी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्ष झाल्यामुळे उपलब्ध झाली आहे. त्याचा फायदा घेण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड.अनिल ढुमणे प्रमुख वक्ते म्हणून कामगारांच्या सामाजिक सूरक्षा व महिला व कामाचे भविष्य व कौशल्य वाढ ह्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
भारतीय मजदूर संघ कोल्हापूर जिल्ह्यातर्फे शाहू स्मारक भवन , दसरा चौक , कोल्हापूर येथे जी- २० च्या अंतर्गत लेबर २० (एल-२०) परिषद सोमवार दि. १९ जून २०२३ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ ह्या वेळेत आहे. यावेळी मान्यवरा एल-२० बाबत माहिती देणार आहेत. कोल्हापूर जिल्हाचे सहाय्यक कामगार आयुक्त मा. श्री. विशाल घोडकसो यांच्या हस्ते एल – २० परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे
जी-२० या प्रगत राष्ट्रांच्या संघटनेचे अध्यक्षपद सध्या भारत देशाकडे आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या G -20 चे अध्यक्ष असून ह्या G-20 अंतर्गत L-20 या कामगार आघाडीची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे. जगभरातील कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्याची मोठी संधी यंदा पहिल्यांदा भारताला जी-२० च्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेऊन सर्व कामगार संघटनांनी लेबर २० च्या परिषदेच्या मसुद्यात आपला सहभाग नोंदवून कामगारांच्या जीवनात आनंद फुलावावा असे आवाहन करण्यात येत आहे. जी-२० मध्ये २० देश सहभागी आहेत.
सदर परिसंवादास भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मोहनराव येनुरे, जयवंतराव देशपांडे अखिल भारतीय असंघटित क्षेत्र प्रभारी ,अण्णा धुमाळ अखिल भारतीय औद्योगिक प्रभारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. प्रदेश चिटणीस उमेशजी महाडिक, श्री. उमेश विश्वाद, कोल्हापूर जिल्हा , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ. अनुजा धरणगावकर, मुकुंद जोशी, श्री. एस. एन.पाटील जिल्हा प्रविण जाधव जिल्हा सचिव व कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. तरी आपण उपस्थित रहावे ही विनंती.