no images were found
8 व्या वेतन आयोगाबाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी
तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीतरी केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागात काम करत असेल, तर ही बातमी महत्त्वाची आहे.
सरकारने निवडणुकीच्या तोंडावर कर्माचाऱ्यांच्या किमान पगारात वाढ करण्याची शक्यता आहे.केंद्र सरकार 7 व्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांसाठी कोणताही आयोग स्थापन करणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र आता केंद्र सरकारच्या मूड बदल्याचे संकेत मिळत आहेत.
7 व्या वेतन आयोगानंतर आता 8 व्या वेतन आयोगाची चर्चा सुरु झाली आहे. एवढेच नाही तर 8 व्या वेतन आयोगाची फाईलही तयार झाल्याचा दावा करण्यात आला आहे .
या सर्व प्रकाराबाबत शासनाकडून कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही. खरे तर 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत निवडणुकीचे वर्ष असल्याने कर्मचार्यांची कोणतीही नाराजी सरकार ओढवून घेणार नाही. त्यामुळे नव्या वेतन आयोगाबाबत संकेत मिळत आहेत.
मोदी सरकारकडून पुढील वेतन आयोगाची घोषणा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी केली जाऊ शकते. नव्या वेतन आयोगात काय होणार आणि काय होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांवर असेल. त्यांच्या देखरेखीखालीच समिती स्थापन केली जाईल. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ मिळणार आहे. फिटमेंट फॅक्टरच्या बाबतीतही काही बदल होऊ शकतात. दरम्यान, सरकार 10 वर्षांतून एकदा वेतन आयोग स्थापन करते.