no images were found
शिवसेनेची नवी जाहिरातीवर अजितदादांचा खोचक टोला
मुंबई : आजच्या जाहिरातीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित करत खोचक टोला लगावला आहे. आजची जाहिरात म्हणजे सारवासारव करण्याचा प्रयत्न आहे. कालच्या चुकीची शिवसेनेकडून दुरुस्ती करण्यात आली आहे.
ही जाहिरात देणारा तो हितचिंतक नेमका कोण आहे? या जाहिरातींसाठी पैसे कोणी दिले? असे अनेक सवाल अजित पवार यांनी उपस्थित केले आहेत माझी शिंदे आणि फडणवीसांसोबत यावर चर्चा झाली. कालच्या जाहिरातीबाबत खोडसाळपणा करण्यात आला. आजची जाहिरात म्हणजे हा खोडसाळपणा दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे.
दरम्यान या जाहिरातीवर भाजपकडून देखील प्रतिक्रिया देण्यात आली आहे. छापण्यात आलेल्या जाहिरातीवरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनं दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी, शिंदे, फडणवीस यांची तुलना अंचबित करणारी आहे.