Home राजकीय परराज्यातील अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील जनतेचा मानसन्मान ठेवावा : श्री.राजेश क्षीरसागर

परराज्यातील अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील जनतेचा मानसन्मान ठेवावा : श्री.राजेश क्षीरसागर

0 second read
0
0
58

no images were found

परराज्यातील अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील जनतेचा मानसन्मान ठेवावा : श्री.राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : सन २०१३ ला गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक झालेल्या लाठीचार्ज खटल्यातून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि खंडोबा तालमीच्या कार्यकर्त्यांची मे.जिल्हा सत्र न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली. गेली सुमारे ९ वर्षे या खटल्याचे काम सुरु होते. आज जिल्हा सत्र न्यायालयात मे.साळुंखे न्यायाधीशांच्या समोर झालेल्या सुनावणीमध्ये सबळ पुराव्या अभावी श्री.राजेश क्षीरसागर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश मे.न्यायाधीशांनी दिले. यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात या खटल्यातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. यावेळी या खटल्याचे कामकाज पाहणारे वकील श्री.धनंजय पठाडे आणि श्री.महांतेश कोले यांचे श्री.राजेश क्षीरसागर आणि कार्यकत्यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.
सन २०१३ च्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीत पोलीस प्रशासनाकडून मंडळाच्या कार्यकर्त्यांवर आरेरावी, दडपशाहीच्या घटना सकाळ पासूनच सुरु होत्या. रात्री खंडोबा तालमीची मिरवणूक शिवसेनेच्या पान- सुपारी मंडपासमोर आल्यानंतर पोलीस दलाकडून एका राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून तत्कालीन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक ज्योतीप्रियासिंग आणि करवीर डीवायएसपी वैशाली माने यांच्या आदेशाने अचानक लाठीचार्ज करण्यात आले. लाठीचार्ज विरोधार रस्त्यावर उतरलेल्या श्री.राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरही बेछूट लाठीचार्ज करून गंभीर जखमी करण्यात आले होते. त्याचबरोबर श्री.राजेश क्षीरसागर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर विनयभंग सारखी खोटी कलमे लावून खोटा गुन्हा दाखल करत सुमारे १५ ते २० दिवस कारागृहात डांबले होते. याबाबत श्री.राजेश क्षीरसागर यांनी राज्याच्या सर्वोच्च सभागृहात आवाज उठवून परराज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची मुजोरी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली होती. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या तत्कालीन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक ज्योतीप्रियासिंग यांना या राज्यातून केडर सोडण्यास भाग पाडले होते. त्या सद्या परराज्यात कार्यरत आहेत.
खटल्याच्या सुनावणीनंतर बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, परराज्यातील काही मुजोर पोलीस अधिकारी हे महाराष्ट्रातील जनतेला कवडीमोल समजतात. ज्या पद्धतीने श्रीमती ज्योतीप्रियासिंग यांनी बेफाम लाठीहल्ला करून कार्यकर्त्यांना गंभीर जखमी केले. याउलट माझ्यासह शिवसेना पदाधिकारी, खंडोबा तालमीच्या कार्यकर्त्यांवर विनयभंग सारखे खोटे गुन्हे दाखल केले. याबाबत सातत्याने राज्याच्या सर्वोच्च सभागृहात आवाज उठविला त्याला आज यश आले. न्यायाच्या मंदिरात “देर हे लेकीन अंधेर नही” याचा प्रत्यय पुन्हा आला असून, राजर्षी शाहू महाराजांच्या स्वाभिमानाच्या शिकवणीप्रमाणे या प्रकरणात लढलो आणि यश आले. परराज्यातून आलेल्या काही मुजोर पोलीस अधिकाऱ्यांच्या गैरकारभारास यामुळे वचक बसला असून, पुढील काळात महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या परराज्यातील प्रत्येक अधिकाऱ्याने राज्यातील लोकप्रतिनिधी आणि जनतेचा मानसन्मान ठेवावा आणि आपल्या वर्दीचा कायदेशीर वापर करून न्यायाची भूमिका घ्यावी, असे सांगितले.
यावेळी शिवसेनेचे जयवंत हारुगले, उदय भोसले, रमेश खाडे, सुनील जाधव, तुकाराम साळोखे, नागेश घोरपडे, अजित राडे, शाहू जुगर, उदय पोतदार, मयूर बुकशेट, बंटी साळोखे, खंडोबा तालमीचे चंद्रकांत सूर्यवंशी, राजेंद्र चव्हाण, महेश चौगले, अरुण दळवी, अमोल साळोखे, दिलीप सूर्यवंशी आदी खटल्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…