no images were found
गुरव समाज भवन उभारण्यासाठी रु.५ कोटी निधीची तरतूद करण्यास पाठपुरावा करू : श्री. क्षीरसागर
कोल्हापूर : राज्यामध्ये गुरव समाज हा धार्मिक कार्य करणारा आणि त्यावरच उदरनिर्वाह करणारा समाज आहे. या समाजाचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. गुरव समाजाला संघटित करून त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी समाज बांधवांकडून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी समाजाचे सोलापूर येथे महाअधिवेशन दि.११ डिसेंबर, २०२२ रोजी पार पडले. या महाअधिवेशनामध्ये गुरव समाजासाठी संत काशीबा महाराज महामंडळ सुरु करून प्राथमिक टप्प्यात रु.५० कोटींचा निधी देण्याबाबत मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केले आहे. गुरव समाज बांधवांच्या सर्वांगीण प्रगती साठी कोल्हापूर शहरातील समाजाच्या जागेत भव्य गुरव समाज भवन उभारण्यासाठी राज्य शासनाकडून रु.५ कोटी निधीची तरतूद करण्यास पाठपुरावा करू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. अखिल महाराष्ट्र गुरव समाज सुधारक मंडळ, कोल्हापूर या संस्थेच्या संचालक मंडळाने श्री.क्षीरसागर यांची भेट घेतली. यावेळी गुरव समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष श्री.धनाजी गुरव यांनी समाजास भेडसावनाऱ्या आणि प्रलंबित प्रश्नांची माहिती दिली. यासह संस्थेकडे छत्रपती शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर येथे स्वमालकीची जागा उपलब्ध असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, गुरव समाजाच्या महाअधिवेशनामध्ये गुरव समाजासाठी संत काशीबा महाराज महामंडळ सुरु करून प्राथमिक टप्प्यात रु.५० कोटींचा निधी देण्याबाबत मा.मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासित केले आहे. याबाबत समस्त गुरव समाज बांधावामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, या निर्णयाचे स्वागत समस्त गुरव समाज बांधवांनी केले आहे. घोषित केलेल्या गुरव समाजाच्या स्वतंत्र महामंडळ गुरव समाजाच्या सर्वसमावेशक उन्नतीसाठी नक्कीच लाभदायक ठरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गुरव समाज बांधवांना संघटीत करून त्यांना न्याय देण्याकरिता अखिल महाराष्ट्र गुरव समाज सुधारक मंडळ, कोल्हापूर हि संस्था कार्यरत असून, सदर संस्थेकडे छत्रपती शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर येथे स्वमालकीची जागा उपलब्ध आहे. या जागेवर गुरव समाजातील अबालवृद्ध, युवा वर्गाच्या सर्वसमावेशक प्रगती साठी “गुरव समाज भवन” उभारल्यास या माध्यमातून समाज बांधवांचे अनेक प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. यासह विविध सामाजिक उपक्रमांसह, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यासाठी याचा फायदा समाजास होणार आहे. त्यामुळे तात्काळ मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचेकडे “गुरव समाज भवन” उभारण्यासाठी रु.५ कोटींची तरतूद करण्यासाठी पाठपुरावा करू, असे सांगितले.
यावेळी अध्यक्ष धनाजी सदाशिव गुरव, कार्याध्यक्ष सहदेव बाबासो गुरव, मिडिया अध्यक्ष जगदीश गुरव, उपाध्यक्ष डॉ.सुरेश गुरव, सल्लागार प्रदीप गुरव, करवीर तालुका अध्यक्ष बाळासाहेब गुरव, सदस्य मनोज गुरव आदी उपस्थित होते.