no images were found
‘सा रे ग म प 2023’ च्या आगामी आवृत्तीत सहभागी होण्यासाठी गुणी गायकांना ‘झी टीव्ही’चे आवाहन!
‘व्हॉटसअॅप’वरील 8850690758/ 8850626157 या क्रमांकांवर तुमच्या ऑडिओ क्लिप्स पाठवा किंवा 9930000323 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या!
गेल्या तीन दशकांत ‘झी टीव्ही’ वाहिनीने प्रेक्षकांपुढे अंताक्षरी, सा रे ग म पा, डान्स इंडिया डान्स आणि इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ यासारखे रिअॅलिटी कार्यक्रम सादर केले. वैयक्तिक कलागुणांवर आधारित असलेले हे रिअॅलिटी कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये जबरदस्त लोकप्रियच झाले असे नव्हे, तर ते आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून आजच्या काळातही त्यांना स्वत:चा असा व्यापक प्रेक्षकवर्ग लाभला आहे. गतवर्षी ‘सा रे ग म पा लिटल चॅम्प्स’ला मिळालेल्या झळाळत्या यशानंतर ‘झी टीव्ही’ने आपला सर्वाधिक काळ सुरू असलेला आणि गाण्यावर आधारित ‘सा रे ग म प’ या प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या नव्या आवृत्तीची घोषणा केली आहे. याद्वारे ज्यांना सुरेल आवाजाची देणगी लाभली आहे, त्यांना पार्श्वगायनाच्या क्षेत्रात करिअर साकारण्यासाठी आपली कला जनतेसमोर सादर करण्याची मोठी संधी या कार्यक्रमाच्या व्यासपिठामुळे मिळू शकते.
तुम्ही जर 15 वा त्यापेक्षा अधिक वर्षांचे असाल आणि आपल्यात उत्तम गायनकला आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर ‘सा रे ग म प 2023’ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्हाला 8850690758/ 8850626157 या ‘व्हॉटसअॅप’ क्रमांकावर आपल्या आवाजातील गाण्याची ऑडिओ क्लिप पाठवावी लागेल किंवा 9930000323 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
या कार्यक्रमाच्या पूर्वीच्या आवृत्त्यांनी भारतातील पार्श्वगायन क्षेत्राला श्रेया घोषाल, कुणाल गांजावाला, कमाल खान, अमानत अली, राजा हसन, संजीवनी आणि बेला शेंडे यासारखे दर्जेदार गायक-गायिका मिळवून दिले आहेत. आता यंदा पुन्हा एकदा ‘सा रे ग म प 2023’ हा कार्यक्रम भारतातील नव्या, होतकरू आणि गुणी गायक-गायिकांना आपली कला जगासमोर सादर करण्यासाठी नवी संधी देत आहे. आगामी आवृत्तीत ही वाहिनी देशाच्या प्रत्येक भागातून दर्जेदार आणि गुणी आवाजाचा शोध घेणार आहे. त्यामुळे तुमचा आवाजही या निवड समितीपर्यंत पोहोचेल, याची काळजी घ्या!
या कार्यक्रमाच्या आगामी आवृत्तीत प्रेक्षकांना काही उत्कृष्ट आणि सुरेल आवाज लाभलेल्या होतकरू गायकांची गाणी ऐकण्याची अपेक्षा ठेवता येईल. पण त्यासाठी 15 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या इच्छुकांनाच या स्पर्धेत सहभागी होता येईल.