no images were found
सेवायोजन कार्डशी आधार क्रमांक लिंक करावा – सहायक आयुक्त सं.कृ.माळी
कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या महास्वयंम पोर्टलवर नोंदणी केली आहे. आधार कार्ड नंबर, ईमेल, मोबाईल नंबर लिंक केलेला नाही, अशा उमेदवारांनी सदर नोंदणी मध्ये लिंक करावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सं.कृ.माळी यांनी केले आहे.
माहिती अद्यावत करण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेत स्थळाच्या मुख्य पृष्ठावरील वरील रोजगार हा पर्याय निवडून नोकरी साधक हा पर्याय निवडून आपला युजर आयडी व पासवर्ड वापरुन लॉगिंग व्हावे व आधार नंबर या ठिकाणी आपला आधार नंबर नमूद करुन कॅप्च्या टाकून सबमिट या बटनावर क्लिक करावे, जेणेकरून आपली माहिती अद्यावत होईल.
सेवायोजन कार्डशी आधार लिंक करताना, काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा दूरध्वनी क्रमांक 0231-2545677 वर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे.