
no images were found
जागतिक संग्रहालय दिनानिमित्त विशेष उपक्रमांचे आयोजन
कोल्हापूर : जागतिक संग्रहालय दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या विदयार्थ्यांनी तयार केलेल्या ‘राजर्षी शाहू महाराजांचा जीवनपट उलगडणाऱ्या माहितीपटाचे’ सादरीकरण राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ – लक्ष्मी विलास पॅलेस, कसबा बावडा, कोल्हापूर येथे गुरुवार, दि.18 मे रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात येणार आहे.
तसेच कोल्हापूरातील निमंत्रित सामाजिक संस्थांना शासकीय संग्रहालय (टाऊन हॉल म्युझियम) मध्ये गुरुवार दिनांक १८ मे २०२३ रोजी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या उपक्रमात सामाजिक संस्था, विदयार्थी, पालक, इतिहास अभ्यासक सहभागी व्हावे. अधिक माहिती व सहभागासाठी मोबाईल क्र. ९८९०७३५२२9 व 9१६८७२०२१२ या वर संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे सहायक अभिरक्षक यांनी केले आहे.
सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाअंतर्गत कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाच्या विद्यमाने जिल्ह्यात जागतिक संग्रहालय दिनानिमित्त व भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त या विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.