no images were found
कोल्हापूरवासियांनी शाहू मिलमधील ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा – अपर्णा वाईकर
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती-शताब्दी वर्षाची सांगता व कृतज्ञता पर्व -2023 निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कृतज्ञता पर्वनिमित्त दि. 6 ते 14 मे या कालावधीत शाहू मिल येथे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर, यांच्या हस्ते 6 मे रोजी करण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शनामध्ये शासकीय व इतर प्रकाशनाची पुस्तके, दुर्मिळ ग्रंथांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. या प्रदर्शनामध्ये विविध विषयावरील तसेच लहान मुलांसाठी दर्जेदार पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध असून कोल्हापूरवासियांनी या ग्रंथप्रदर्शन व विक्रीच्या बुक स्टॉलला भेट देऊन ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी केले आहे.