
no images were found
शरद पवारांच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांचं परखड भाष्य; म्हणाले…
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील निर्णय आणि शरद पवार यांच्या आत्मचरित्रातील उल्लेख; उद्धव ठाकरे म्हणाले…
मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. उद्धव ठाकरे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. “प्रत्येक पक्षाने अंतर्गत काय करावं, याचा अधिकार त्यांना असतो. त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या. त्यांचा निर्णय झाल्यावर काय बोलायचं ते बोलू, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. लोक माझे सांगाती हे शरद पवार यांचं आत्मचरित्र आणि त्यातील घटनांवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलंय.”कुणी काय लिहावं याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मी मुख्यमंत्री म्हणून काय काम केलं हे जगजाहीर आहे. प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबाचा सदस्य वाटतो हे माझ्यासाठी खूप आहे, माझी मतं ठाम आहेत. माझ्या मतांवर मी ठाम आहे. मला व्यक्तींचा किंवा मोदींचा पराभव करण्यासाठी नाहीतर वृत्तीचा पराभव करायचा आहे. माझ्याकडून महाविकास आघाडीला कोणतेही तडे जाणार नाहीत, असंही उद्धव ठाकरे यांनी ,स्पष्ट केलं आहे.
पवारसाहेबांशी माझं अजून बोलणं झालेलं नाही. त्यांचं सर्व होऊद्या मग सविस्तर बोलू, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. आम्ही सभेचा कार्यक्रम ठरवला होता. या सभा घेणं विचित्र वाटायला लागलं आहे. दुपारच्या वेळी ऊन खूप असतं. म्हणून या सभा मेनंतर घ्यायचा विचार सुरु आहे. पण माझी महाडची सभा होणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
मोदीजी म्हणाले बजरंग बली की जय म्हणून मतदान करा. कदाचित कायद्यात बदल झाला असेल. शिवसेनाप्रमुखांना निवडणूक लढण्यासाठी बंदी घातली होती. मग कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र तेथील लोकांवर भाषिक अत्याचार होतोय. म्हणून त्यांनी मराठी माणसाची एकजूट जपणाऱ्या उमेदवारांना छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून मतदान करावे. मराठी माणसाची वज्रमुठ जपा. तेथील मतदारांनी ठरवायला हवे जय भवानी जय शिवाजी म्हणून मतदान करा, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी बेळगावमधील जनतेला केलं.
‘मी त्यांचा हिम्मत पाहायला तयार नाही. मी माझ्या लोकांना भेटायला जातोय. या प्रकल्पाबाबत विचित्र मते तयार आहे. रिफायनरीचे प्रदूषण मला परवडणारे नाही. आमचे सरकार पाडल्यानंतर राज्यात येणारे चांगले प्रकल्प गुजरातकडे वळवले. माझे पत्र नाचवता, पण माझ्या काळात येणारे प्रकल्प का वळवले, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. डोक्यावर बंदूक टेकवून तुम्ही प्रकल्प लादू नका. कुणाची बाजू घेऊन तुम्ही येताय. उपऱ्यांनी तेथील जमिनी घेतल्या आहेत. तुम्ही उपऱ्यांची सुपारी घेऊन माझ्या भूमिपुत्रांच्या अंगावर येत आहात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राणे कुटुंबावर निशाणा साधला.