no images were found
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन फोरेक्स आउटलेट्सचे उद्घाटन
गोवा : थॉमस कूक (इंडिया) लिमिटेड ह्या भारतातील आघाडीच्या सर्वमार्गीय (ओम्नीचॅनल) प्रवास सेवा कंपनीने गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन फोरेक्स आउटलेट्सचे उद्घाटन केले. कंपनीने नवीन गोवा विमानतळावर ४ परकीय चलनाची काउंटर्स स्थापन करण्यासाठी व चालवण्यासाठी ५ वर्षांचा करार केला आहे. ह्यामुळे थॉमस कूक इंडियाचे गोव्यातील फोरेक्स नेटवर्क / ग्राहक संपर्क केंद्रे ६ आउटलेट्सपर्यंत विस्तारले आहे. यामध्ये २ शाखा व ४ विमानतळ आउटलेट्सचा समावेश आहे. शिवाय, कंपनी भारत, श्रीलंका व मॉरिशस ह्या देशांत २५ विमानतळावर काउंटर्स चालवते.
व्यापारी पेमेंट्स सुरक्षित, अखंडित व सोयीस्कर होतील ह्याची खात्री करणाऱ्या ह्या उपक्रमाद्वारे, थॉमस कूकची गोवा विमानतळ काउंटर्स, जी-२० राष्ट्रसमूहातील परदेशी नागरिकांना तसेच अनिवासी भारतीयांना, आगमनानंतर, यूपीआय एनेबल्ड भारतीय रुपयांचे व्यवहार करण्यासाठी, सुसज्ज करतील. भारतभरातील यूपीआय क्यूआर सुविधेने सुसज्ज असलेल्या लक्षावधी व्यापारी आस्थापनांमध्ये आपले आयएनआर वॉलेट वापरून हे प्रवासी सुरळीत व संरक्षित डिजिटल पेमेंट्स करू शकतील. हे प्रीपेड पेमेंट उत्पादन, पाइन लॅब्जद्वारे, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून प्राप्त केलेल्या पीपीआय अधिकृत परवानगीअंतर्गत, जारी करण्यात येत आहे.
थॉमस कूकच्या नवीन विमानतळ काउंटर्सची रचना ‘एथ्निसिटी-लग्झरी-कम्फर्ट’ ह्या संकल्पनांभवती करण्यात आली आहे. ही काउंटर्स उत्साहवर्धक आणि चैतन्यपूर्ण आहेत. खुल्या रचनेची संकल्पना तसेच बसकी काउंटर्स ह्यांद्वारे प्रवाशांच्या आरामाला ह्यात प्राधान्य देण्यात आले आहे. भारतीय घटकांवर भर देणे हे ह्यातील महत्त्वपूर्ण अंग आहे. ह्या काउंटर्सवर भारतीय कलाकृती, प्रतिमा व सोनेरी कमानी लावण्यात आल्या आहेत. पर्यावरणाच्या संरक्षणाप्रती असलेली कंपनीची बांधिलकी कायम राखत, शाश्वत साहित्याचा वापरही लक्षणीय पद्धतीने करण्यात आला आहे.
थॉमस कूक (इंडिया) लिमिटेडच्या परकीय चलन विनिमय विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. दीपेश वर्मा म्हणाले, गोवा ही थॉमस कूक इंडियासाठी उच्च वाढीची बाजारपेठ आहे. नवीन मोपा विमानतळाद्वारे पहिल्या वर्षात सुमारे ४.३ दशलक्ष प्रवाशांना सेवा दिली जाणे अपेक्षित आहे, तर पुढील ५ वर्षांत हा आकडा सुमारे १३.१ दशलक्षांपर्यंत जाणे अपेक्षित आहे. अंतर्गामी तसेच बहिर्गामी प्रवाशांच्या परकीय चलन मागणीचा लाभ घेण्याची महत्त्वाची संधी थॉमस कूक ला विमानतळावरील नवीन फोरेक्स काउंटर्समुळे प्राप्त झाली आहे.