
no images were found
महापालिकेच्यावतीने अग्निशमन सेवा दिन साजरा
कोल्हापूर :- दि. 14 एप्रिल 1944 या दिवशी एस.एस. फोर्ट स्टिकींग जहाजला विक्टोरीया डॉक मुंबई बंदरावर भीषण आग लागली होती. ती आग विझवताना अग्निशमनाचे 66 जवान शहीद झाले यांच्या बलिदानाबद्ल अग्निशमन सेवा दिन व सप्ताह साजरा करण्यात येतो.
अग्निशमन सेवा दिनानिमित्त सासणे ग्राऊंड येथे महापालिकेच्यावतीने अग्निशमन केंद्रात अग्निशमन सेवा बजावत असताना प्राणाची आहुती देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानवंदना, श्रध्दांजली व पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. या कार्यक्रमात फायर गीत गाऊन हुताम्यांना श्रध्दाजंली वाहण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, स्थानक अधिकारी मनीष रणभिसे, कांता बांदेकर, दस्तगीर मुल्ला, जयवंत खोत व अग्निशमन दलाचे जवान व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ताराराणी फायर स्टेशन -कावळानाका-व्हिनस कॉर्नर- लक्ष्मीपूरी-बिंदू चौक-मिरजकर तिकटी-महाद्वार रोड-पापाची तिकटी-महापालिका मुख्य कार्यालयापर्यंत अग्निशमन गाडी व दुचाकीवरुन रॅली काढण्यात आली. महापालिका अग्निशमन दलाच्यावतीने शुक्रवार दिनांक 14 ते 20 एप्रिल पासून अग्निशमन सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यामध्ये शाळा, कॉलेज व सार्वजनिक ठिकाणी अग्निशमन दलाची सुरक्षेच्या दृष्टीने प्रात्याक्षिके दाखविण्यात येणार आहेत.