
no images were found
अंकिता लोंढे ने केले सोनाली बेंद्रेला प्रभावित आणि मिळवले टोपण नाव!
गेल्या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सरच्या तिसऱ्या सत्राचा शुभारंभ झाला, ज्यात प्रेक्षकांनी डान्सच्या नवीन युगाची सुरुवात झालेली पाहिली. या सत्रात ऑडिशनमध्ये केवळ 90 सेकंदात आपल्या उत्कृष्ट मूव्ह्ज दाखवून परीक्षक सोनाली बेंद्रे, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस यांना प्रभावित करण्यासाठी देशाच्या विभिन्न भागांमधून अनेक गुणी कलाकार आले आहेत. हे परीक्षक EENT स्पेशालिस्ट आहेत, म्हणजे ते परफॉर्मन्सला एन्टरटेन्मेंट, इमोशन्स, न्यूनेस आणि टेकनिक या निकषांवर पारखतात. ऑडिशन फेरीतील उमेदवारांचे अद्भुत परफॉर्मन्स आणि विविध शैली पाहून तिन्ही परीक्षक थक्क झाले आहेत आणि येत्या आठवड्यात देखील स्पर्धकांचे जबरदस्त परफॉर्मन्स पाहून ते पुन्हा एकदा अवाक होताना दिसणार आहेत.
‘कान्हा माने ना’ गाण्यावर पुण्याची मुलगी अंकिता लोंढेने केलेला हृदयस्पर्शी कंटेंपररी आणि क्लासिकल डान्स पाहून परीक्षक प्रभावित झालेले दिसतील. त्या परफॉर्मन्सने मंत्रमुग्ध झालेली सोनाली बेंद्रे अंकिताला मराठीत म्हणाली, “मला तुझा परफॉर्मन्स खूप आवडला!”22-वर्षीय अंकिताने डान्समध्ये करियर करण्यासाठी कम्प्युटर इंजिनियरिंगची डिग्री अर्ध्यात सोडली आहे. अंकिताच्या आईने तिला मोठी डान्सर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डान्सचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा आणि भक्कम साथ दिली पण दुर्दैवाने महामारीच्या तडाख्यात तिला आपल्या आईला गमवावे लागले. आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंकिता डान्समध्ये कारकीर्द करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहिली आणि महत्प्रयासाने ती इंडियाज बेस्ट डान्सर 3 च्या मंचावर पोहोचली आहे.
अंकिताची कहाणी ऐकून सद्गदित झालेल्या सोनाली बेंद्रेने तिला घट्ट आलिंगन देत म्हटले, “मला तुझा अभिमान वाटतो.” ती पुढे म्हणाली, “इतक्या लहान वयात तू आपल्या कुटुंबाची जबाबदारी उचलली आहेस. आणि आपल्या पॅशनचा तू पाठपुरावा करत आहेस. हे दृश्य पाहून तुझ्या आईला, मंजू शाहला नक्की खूप आनंद झाला असता.”अंकिताची आई तिला ‘पिल्लू’ म्हणायची हे समजल्यावर सोनाली अंकिताला म्हणाली, “तू जर या स्पर्धेत पुढे गेलीस, तर तू माझी ‘पिल्लू’ असशील! मंजूची हरहुन्नरी मुलगी पिल्लू!”अंकिता लोंढेच्या मूव्ह्ज तिला मेगा ऑडिशनमध्ये घेऊन जाण्याइतक्या दमदार असणार का?