
no images were found
NCC च्या सरावादरम्यान फायरिंग, प्रशिक्षकास 7 वर्ष सक्तमजुरी
पुणे : राष्ट्रीय छात्र सेनेच्या सरावादरम्यान फायरिंग करताना 13 वर्षीय विद्यार्थ्याच्या डोक्यात गोळी लागून त्याचा मृत्यू झाला होता.त्याच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या प्रशिक्षकास पुणे न्यायालयाने 7 वर्ष सक्तमजुरी आणि 5 लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सुनावलेल्या दंडाच्या रक्कमेतील 3 लाख रूपये पराग इंगळे याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी तसेच आमोद घाणेकरने दंड भरला नाही तर त्याला अतिरिक्त 1 वर्ष शिक्षा भोगावी लागणार आहे,असे न्यायालयाच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे. सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी हा निकाल दिलेला आहे.
सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली असून आमोद अनिल घाणेकर असं शिक्षा झालेल्या प्रशिक्षकाचे नाव आहे.. पराग देवेंद्र इंगळे 13 वर्षीय असून याचा या घटनेमध्ये मृत्यू झाला होता. फेब्रुवारी 2013 मध्ये सेनावती बापट रस्त्यावरील राष्ट्रीय छात्र सेनेच्या म्हणजेच एनसीसीच्या मुख्यालयात ही घटना घडली होती. पराग इंगळे हा पाषाण परिसरातील लॉयला शाळेचा विद्यार्थी होता. एनसीसीच्या सरावावेळी घाणेकर मुलांना जमिनीवर झोपवून गोळीबार करण्याचं प्रशिक्षण देत होता. तेव्हा अचानक पराग उठून उभा राहिला अन् घाणेकरने झाडलेली गोळी परागच्या डोक्याला लागली होती. घाणेकर विरुद्ध डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर आरोपपत्र दाखल केलं होतं.
डेक्कन पोलिस ठाण्यात याप्रकरणी आमोद घाणेकर याच्याविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती पोलिसांनी त्याच्याविरूध्द न्यायालयात चार्जशीट दाखल केले होते. सदरील गुन्हयात वगळण्यात यावे यासाठी आमोद घाणेकरने अर्ज देखील केला होता. मात्र, सप्टेंबर 2014 मध्ये तो अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. खटल्याचे कामकाज सरकारी वकिल राजेश कावेडिया यांनी पाहिले आहे.