
no images were found
HDFC बँकेचे ग्राहकांसाठी आनंदवार्ता
खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी कर्ज देणारी वित्तीय संस्था एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेतलेल्या लाखो ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एचडीएफसी बँकेने निवडक कालावधीसाठी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये ०.८५ टक्क्यांपर्यंत कपात केली असून नवे दर १० एप्रिलपासून लागू झाले आहेत.
अलिकडेच रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यानंतर MCLR मध्ये कपात करणारी एचडीएफसी ही देशातील पहिली बँक आहे.
एचडीएफसी मधील कपातीचा एचडीएफसी कडून गृहकर्ज घेणार्यांना फायदा होणार नाही कारण बहुतेक गृहकर्ज एचडीएफसी लिमिटेड कडून घेतले जातात. ज्यांचे कर्ज MCLR शी जोडले गेले आहे अशा लोकांनाच याचा फायदा होईल. यामध्ये काही जुनी वैयक्तिक आणि वाहन कर्जे समाविष्ट आहेत.
या कपातीनंतर, ओव्हरनाईट एमएलसीआर ७.८० टक्क्यांवर आला आहे. पूर्वी तो ८.६५ टक्के होता. त्यात ८५ बेसिस पॉइंट्सनं कपात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, एक महिन्याचा एमएलसीआरदेखील ८.६५ टक्क्यांवरून ७.९५ टक्क्यांवर आला आहे. त्यात ७० बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली आहे. तीन महिन्यांचा एमएलसीआर ४० बेसिस पॉईंटनं कमी करण्यात आला आहे. तो आता ८.७ टक्क्यांवरून 8.3 टक्क्यांवर आला आहे. एचडीएफसी बँकेने सहा महिन्यांचा एमएलसीआर १० बेसिस पॉईंटनं कमी करून ८.७ टक्के केला आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची नुकतीच बैठक झाली ज्यामध्ये रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
रिझर्व्ह बँकेनं २९१६ मध्ये एमएलसीआर प्रणाली सुरू केली. हा वित्तीय संस्थेसाठी अंतर्गत बेंचमार्क आहे. कर्जाचा किमान व्याजदर एमएलसीआर प्रक्रियेत निश्चित केला जातो. एमएलसीआर हा किमान व्याजदर आहे ज्यावर बँक कर्ज देऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचे तर, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट ही भारतीय रिझर्व्ह बँकेनं निश्चित केलेली एक पद्धत आहे जी कर्जावरील व्याजदर ठरवण्यासाठी कमर्शिअल बँका वापरतात. रेपो दरातील बदलामुळे एमसीएलआरवरही परिणाम होतो.