no images were found
स्कोडा स्लाव्हियाला क्रॅश सेफ्टीमध्ये मिळाले ५-स्टार रेटिंग
मुंबई – स्कोडा ऑटो इंडियाच्या सुरक्षितता व क्रॅश-योग्यता क्षमतेचा स्तर उंचावत आहे, जेथे स्लाव्हिया सेदानने नुकतेच करण्यात आलेल्या ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (ग्लोबल एनसीएपी) क्रॅश चाचण्यांमध्ये ५ पैकी संपूर्ण ५-स्टार रेटिंग मिळवले. यामुळे स्लाव्हिया ग्लोबल एनसीपीने चाचणी केलेली आतापर्यंतची सर्वात सुरक्षित कार ठरली आहे आणि भारतासाठी सेफर कार्सचे ध्येय अधिक पुढे गेले आहे. तसेच स्कोडा ऑटो इंडिया क्रॅशबाबत चाचणी केलेल्या कार्सचा ताफा असलेली भारतातील एकमेव उत्पादक कंपनी आहे आणि या कार्सना प्रौढ व लहान मुले प्रवाशांसाठी ५-स्टार्स मिळाले आहेत.
स्लाव्हियाने स्थापित केलेल्या सुरक्षितता मानकांबाबत सांगताना स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रॅण्ड संचालक श्री. पीटर सोलकम्हणाले, ‘‘स्कोडामध्ये आमच्या धोरणाचा भाग म्हणून ग्राहकांसाठी सुरक्षिततेबाबत कोणतीच तडजोड केली जात नाही. आमची दुसरी इंडिया २.० कार – स्लाव्हियाला ग्लोबल एनसीएपी सुरक्षितता चाचणीमध्ये ५-स्टार रेंटिंग मिळाले आहेत. हे आमच्या ब्रॅण्डची मूल्ये सेफ्टी, फॅमिली, ह्युमन टच यांच्याशी परिपूर्णपणे संलग्न आहे. आम्ही स्कोडा उत्पादने खरेदी करण्याचा निर्णय घेतलेल्या आमच्या ग्राहकांचे कौतुक करतो आणि आम्ही त्यांना बाजारपेठेतील सर्वात सुरक्षित कार प्रदान करू शकतो, याचा आम्हाला आनंद होत आहे. सुरक्षिततेप्रती सर्वसमावेशक दृष्टिकोनासह आमच्याकडे ५-स्टार सुरक्षित कार्सची पूर्णत: चाचणी केलेली श्रेणी आहे; यामधून आम्ही आमच्या कार्सचा दर्जा, टिकाऊपणा आणि सुरक्षिततेवर नेहमी लक्ष केंद्रित केले आहे हे दिसून येते. सुरक्षितता हे आमच्या धोरणाचे मूळ तत्त्व आहे आणि आम्ही या तत्त्वासह कार्सची निर्मिती करत राहू.”
स्थानिकीकरण, मालकीहक्काचा कमी खर्च व देखरेख यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासह, तसेच स्कोडाचे गतीशील ड्रायव्हिंग पैलू राखत व सुरक्षिततेबाबत कोणतीच तडजोड न करत स्लाव्हिया डिझाइन करण्यात आली. या कारची विविध परिणामांसाठी अंतर्गत चाचणी करण्यात आली. सुरक्षिततेला प्राधान्य देत स्लाव्हिया डिझाइन करण्यात आली आहे. तिची बाह्य रचना लेझर वेल्डेड आहे. रचनेमध्ये उच्च शक्तिशाली स्टीलचा समावेश आहे आणि अंतर्गत केबिनच्या तुलनेत कारच्या बाहेरील भागावर क्रॅशचा होणारा परिणाम दूर करण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे. हे प्रबळ व इम्पॅक्ट-अॅब्जॉर्बिंग बॉडी स्ट्रक्चर अॅक्टिव्ह व पॅसिव्ह सुरक्षितता तंत्रज्ञानांशी पूरक आहे, ज्यामुळे स्लाव्हिया बाहेरून व आतून पूर्णत: सुरक्षित कार आहे.
स्लाव्हियामध्ये जवळपास ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, मल्टी-कोलिजन ब्रेकिंग, ट्रॅक्शन कंट्रोल, अॅण्टी-लॉक ब्रेक्स, चाइल्ड सीट्ससाठी आयएसओफिक्स माऊंट्स, टॉप टेथर अँकर पॉइण्ट्स, रेन-सेन्सिंग वायपर्स, ऑटोमॅटिक हेडलाइट्स आणि टायर-प्रेशर मॉनिटरिंग अशी सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत