no images were found
मनपा निष्क्रिय प्रशासक त्वरित बदला : राहूल चिकोडे
कोल्हापूर : शहारातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्ठमंडळाने सर्किट हाउस या ठिकाणी पालकमंत्री यांची भेट घेतली.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल म्हणाले, कोल्हापूर शहरात महानगरपालिकेमध्ये अनेक वर्षे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. या काळात कोल्हापूर शहराचा सर्वागीण विकास होणे अपेक्षित होते परंतु कोणत्याही बाबतीत शहराचा विकास झालेला नाही. गेल्या सव्वा दोन वर्षापासून महापालिकेवर प्रशासक असून त्यांनी कोल्हापूरसाठी काहीही केलेले नाही. शहराचे मुलभूत प्रश्न देखील प्रशासकांच्या वतीने सोडवले गेलेले नाहीत. पाणी, रस्ते, गटर्स, बगीचे, ड्रेनेज, शिक्षण, आरोग्य, केएमटी याविषयात मनपा प्रशासन अस्तिवात आहे की नाही असे वाटावे अशी स्थिती जनतेसमोर आहे. घरफाळा घोटाळा, तोट्यातील केएमटी, रखडलेली थेट पाईपलाईन असे अनेक विषय प्रलंबित आहेत. पंचगंगा प्रदूषण, रंकाळा सुशोभीकरण, घनकचरा व्यवस्थापन याबाबतीत कोणताही विचार झालेला नाही असे नमूद केले. त्यामुळे कोल्हापूरातील निष्क्रिय प्रशासक त्वरित बदलून कोल्हापूरसाठी एक चांगला अधिकारी प्रशासक म्हणून आणावा अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. पंधरा दिवसातून एक वेळा भाजपा शिष्ठमंडळास कोल्हापूर शहराच्या विकासासाठी चर्चा करण्यासाठी आपली भेट मिळावी अशी मागणी देखील करण्यात आली. यासर्व विषयात पालकमंत्री या नात्याने आपण गांभीर्याने लक्ष घालून कोल्हापूर शहरातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत.
भाजपा शिष्ठमंडळाच्या निवेदनाला उत्तर देताना पालकमंत्री म्हणाले, येत्या ८ दिवसांत भाजपा शिष्ठमंडळाची बैठक महापालिकेच्या प्रशासक व सर्व खाते प्रमुखांसोबत लावण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. त्याचबरोबर प्रशासकांच्या बदली संदर्भात सकारत्मक प्रतिसाद दिला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प्र.का.सदस्य महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस दिलीप मेत्रानी, विजय जाधव, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, नाना कदम, मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, संजय सावंत, अमोल पालोजी, विजय आगरवाल, विवेक कुलकर्णी, डॉ.राजवर्धन, अशिष कपडेकर, रमेश दिवेकर, सुधीर देसाई, गिरीश साळोखे, विजयसिंह खाडे-पाटील, गायत्री राउत आदी उपस्थित होते.