Home शैक्षणिक ४० वी जिस्फी(GISFI) व आंतरराष्ट्रीय परिषद चा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न

४० वी जिस्फी(GISFI) व आंतरराष्ट्रीय परिषद चा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न

2 second read
0
0
56

no images were found

४० वी जिस्फी(GISFI) व आंतरराष्ट्रीय परिषद चा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयचे
इंजिनिअरिंग ऑफ कोल्हापूर यांनी आयोजित केलेले जिस्फी(GISFI) बैठक व ६ जी आणि वायरलेस नेटवर्क टेक्नॉलॉजी ची आंतरराष्ट्रीय परिषद हॉटेल सयाजी येथे प्रोफेसर अनिल सहस्त्रबुद्धे( नॅक) चे चेअरमन व प्रमुख पाहुणे प्रोफेसर रामजी प्रसाद यांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा संपन्न झाला.
प्रोफेसर रामजी प्रसाद(चेअरमन जिस्फी, अरहास युनिव्हर्सिटी डेन्मार्क) आपले मत व्यक्त करताना आत्मनिर्भर भारत या पंतप्रधानांच्या महत्वकांक्षी प्रकल्प बाबत काम करण्यासाठी उपस्थितांना संबोधित केले. उपस्थित असणाऱ्या सर्व नवसंशोधक व विद्यार्थ्यांना ६ जी तंत्रज्ञान व वायरलेस कमुनिकेशन यावरील संशोधनासाठी प्रेरित केले.
प्रोफेसर अनिल सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना नवीन शैक्षणिक धोरण व गुणवत्ता पूर्वक शिक्षण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोच करता येईल यावर आपले मत व्यक्त केले.
AICTE ,भारत सरकार व देशातील नामांकित शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातून चालू असलेल्या स्वयम या शैक्षणिक कार्यक्रमाबाबत विद्यार्थ्यांना जागरूक केले.तसेच ६जी व नवीन तंत्रज्ञान याचा शिक्षणात जास्तीत जास्त कसा उपयोग करता येईल यावर मत मांडले. या परिषद साठी चीफ सायंटिस्ट रोबोटिक्स टी सी एस बेंगलोर चे बालमुरलीधर प्रसाद व चीफ सायंटिस्ट येम्बडेड डिव्हाईस बेंगलोर अर्पण पाल उपस्थित होते.
३ व ४ एप्रिल रोजी जिस्फी बैठक अंतर्गत देश व विदेशातील ६ जी तंत्रज्ञान व त्या संदर्भात सुरू असलेले संशोधन या बद्दल चर्चा होणार झाली
आंतरराष्ट्रीय परिषदेअंतर्गत ४२ नवसंशोधकांचे संशोधन पेपर सादर होणार झाले व त्याच्यातील निवडक पेपर आंतरराष्ट्रीय परिषद अंतर्गत प्रसिद्ध होणार आहेत. तसेच ५ एप्रिल रोजी ‘स्टार्टअप इकोसिस्टिम इंडिया अँड ग्लोब’ अंतर्गत स्टार्टअप वर ६ वेगवेगळ्या पाहुण्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.यावेळी जगभरातून नवसंशोधक, अध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.१०० संशोधन पेपर मधून ४२ निवडक पेपर परिषदेत सादर केले.
यावेळी बऱ्याच संशोधकांनी दूरस्थ संवाद साधत सहभाग नोंदवला.
या परिषद च्या आयोजनासाठी केआयटी चे चेअरमन सुनील कुलकर्णी,व्हाईस चेअरमन साजिद हुदली,सचिव दीपक चौगुले विश्वस्त भरत पाटील व प्रतापसिंह रावराणे ,कार्यकारी संचालक डॉ. विलास कर्जीनी , संचालक मोहन वनरोट्टी यांचे मार्गदर्शन मिळाले.
पाहुण्यांची ओळख प्राध्यापक सोनल लाड व प्राध्यापक मिनाज शिकलगार यांनी करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दानिश उस्ताद आणि भूमी लिंग्रस यांनी केले. आभार प्रदर्शन प्राध्यापक सुप्रिया काटकर यांनी केले. आयोजनासाठी सर्व इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकमुनिकेशन च्या शिक्षकांच्या सहकार्याने उदघाटन सोहळा दिमाखात पार पडला.परिषदेचे प्रमुख आयोजक डॉ. महेश चव्हाण व समन्वयक म्हणून डॉ.नितीन सांबरे यांनी काम पाहिले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…