
no images were found
गणेशोत्सव तोंडावर आला असताना करूळ घाटमार्ग बंद, सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सिंधुदुर्ग : गणेशोत्सव अगदी जवळ आला असताना पश्चिम महाराष्ट्राला तळकोकणाशी जोडणारा करूळ घाटमार्ग 25 ऑगस्टपर्यंत बंद रहाणार असल्याचे महत्त्वाचे आदेश माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचे समजते.
पश्चिम महाराष्ट्राला तळकोकणाशी जोडणारा करूळ हा मोठी वर्दळ असलेला सर्वात महत्वाचा घाट. हा घाट 25 ऑगस्टपर्यंत बंद असणार आहे. सिंधुदुर्गातील वैभववाडी येथील हा करूळ घाटमार्ग 25 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. घाटात संरक्षण भिंत दरीत कोसळल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलेला आहे. दरम्यान या मार्गावरील जड व अवजड वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली आहे.
तर गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या ठाण्यातील चाकरमान्यांसाठी मनसेकडून तब्बल 100 बसेस मोफत सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, यंदा कोकणसाठी विशेष ‘मनसे एक्सप्रेस’ देखील मोफत सोडण्याचा संकल्प ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी बोलून दाखवला, अशी माहिती मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिली.