Home क्राईम पुण्याच्या महिलेची मंत्रालयात आत्महत्या

पुण्याच्या महिलेची मंत्रालयात आत्महत्या

2 second read
0
0
39

no images were found

पुण्याच्या महिलेची मंत्रालयात आत्महत्या

धुळे : येथील अवधान शिवारातील एमआयडीसी परिसरातील पतीच्या नावे असलेला प्लॉट एकाने बनावट कागदपत्रांद्वारे स्वतःच्या नावावर करत बळकावला.या प्रकरणात न्याय न मिळाल्याने विधवा महिलेने मुंबईमधील मंत्रालयात विषारी औषध प्राशनकरून आत्महत्या केली. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे

सध्या पुणे येथे राहण्याऱ्या या महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. त्यांच्या पतीचा भुखंड धुळे येथे आहे. शीतल रवींद्र गादेकर (रा. लक्ष्मी हॉटेल, प्लॉट न. १६, एमआयडीसी, धुळे, ह. मु. पुणे) या महिलेचे पती रवींद्र गादेकर यांच्या नावे धुळे एमआयडीसी परिसरात प्लॉट न. १६ आहे. हा प्लॉट नरेशकुमार माणकचंद मुणोत याने बोगस नोटरी करत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून जबरदस्तीने हडपला असल्याची तक्रार शीतल गादेकर यांनी येथील पोलिस अधीक्षकांसह मोहाडी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षकांकडे आणि मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, प्रादेशिक एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे केली होती.त्याबाबत त्या सातत्याने न्याय मिळावा म्हणून पाठपुरावा करीत होत्या. त्यासाठीच त्या मंत्रालयात गेल्या होत्या.

 ही तक्रार गादेकर यांनी २१ मार्च २०२३ ला केली असली तरीही २०२० पासून शीतल गादेकर या सतत त्यांनी केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करीत होत्या. मात्र, तरीही त्यांना याबाबत न्याय न मिळाल्याने त्यांनी २७ मार्चला मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी २७ मार्चला मंत्रालयात विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर शीतल गादेकर यांचा २८ मार्चला मृत्यू झाल्याची माहिती धुळे पोलिसांना प्राप्त झाली. त्यांच्या आत्महत्येच्या धक्कादायक घटनेने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

 गेल्या तीन वर्षापासून धुळे एमआयडीसीमधील प्लॉटची मालकी मिळण्यासाठी सतत संघर्ष करणाऱ्या शीतल गादेकर यांना जिल्हा प्रशासनासह पोलिस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागल्याचा संतप्त सूर उमटत आहे.

 दरम्यान, मुंबईत शवविच्छेदनानंतर शीतल गादेकर यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला. यानंतर धुळे येथे गतिमान हालचाली सुरु झाल्या. रात्री मोहाडी पोलिस ठाण्यात संशयित मुनोत व एमआयडीसी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील येथे तातडीने दाखल झाले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …