
no images were found
मित्रानेच मित्राच्या डोक्यात फोडली बाटली आणि केले वार
कोल्हापूर : दारू पिताना मोबाईलवर गेम का खेळतोस अशी विचारणा करत झालेल्या वादात मित्रानेच मित्राच्या डोक्याच्या रिकामी दारूची बाटली फोडल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात घडली.मित्राने केलेल्या हल्ल्यात अक्षय संदिप गायकवाड ( वय 23 रा. शिये, ता. करवीर ) हा जखमी झाला. अक्षयने दिलेल्या फिर्यादीवरून पंकज धोंडीराम चव्हाण (रा. शिये, ता. करवीर ) याच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अक्षय व पंकज मोरे यांच्या भाड्याच्या खोलीत रात्री दारु पित बसले होते. यावेळी अक्षय गायकवाड मोबाईलवर गेम खेळत होता. यावेळी पंकजने दारु पिताना गेम काय खेळतोस? असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर अक्षयने ही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर चिडलेल्या पंकजने दारुची रिकामी बाटली गायकवाडच्या डोक्यात फोडल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर पुन्हा दोघांमध्ये शिवीगाळ झाल्यानंतर दारुच्या नशेत पंकज ने अक्षयच्या तोंडावर, खांद्यावर आणि छातीवर फुटलेल्या बाटलीने वार केले. यामध्ये गायकवाड गंभीर जखमी झाला. या भांडणात जखमी अक्षयच्या मित्राने त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने अनेक ठिकाणी वार केले. जखमी अक्षय गायकवाडवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.