no images were found
जिल्हा वार्षिक योजनेचा निधी 31 मार्च पूर्वी खर्च करा –पालकमंत्री केसरकर
कोल्हापूर : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 2022-23 मधील सर्व कामे तात्काळ पूर्ण करुन घेवून प्राप्त निधी 31 मार्च पूर्वी खर्च करावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना दिल्या.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना कामांची आढावा बैठक पालकमंत्री श्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री श्री केसरकर यांनी चालू वर्षी झालेली कामे व सुरु असलेल्या कामांचा आढावा घेवून कामाची सद्यस्थितीची माहिती विविध यंत्रणांच्या प्रमुखांकडून घेतली. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त निधीतून होणारी कामे गतीने पूर्ण करताना कामांचा दर्जा चांगला ठेवा, अशा सूचना त्यांनी दिल्या.