no images were found
न्यू पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेत यश
कोल्हापूर -श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर आयोजित टेक्नो-एन्हान्स 2K23 या राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेत ‘शार्क टॅन्क’ या विभागामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मशीन लर्निंग (एआयएमएल) विभागातील प्रथम वर्षाच्या पार्थ सुर्यवंशी आणि पारस कवितकर या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. विशेष म्हणजे त्यांनी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करत ही चमक दाखवली. या विद्यार्थ्यांनी ‘ Ai Based Head Mouse’ हा प्रकल्प सादर केला. या प्रकल्पामध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना अंतर्भूत असून निव्वळ डोक्याच्या हालचालींवरून संगणकाला अथवा संगणक आधारित यंत्रणेला हव्या त्या सुचना देता येणार आहेत. हा प्रकल्प विशेष करून विकलांग व्यक्तींसाठी वरदान ठरणार आहे. तसेच, हा प्रकल्प घरगुती आणि औद्योगिक कामांमध्ये गतिमानता आणणार आहे. या विद्यार्थ्यांना एआयएमएल विभागप्रमुख प्रा. अश्विनकुमार व्हरांबळे, प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील, व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, संचालिका सौ. सविता पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.