no images were found
जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम
कोल्हापूर :- जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने केशवराव भोसले नाट्यगृह येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिला अधिकारी, महिला कर्मचारी यांचेसाठी विविध विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
सकाळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, उप-आयुक्त शिल्पा दरेकर व सहा.आयुक्त विनायक औंधकर यांच्या हस्ते वृक्षास पाणी घालून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सहा. आयुक्त औंधकर यांनी उपस्थित सर्व महिलाना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये निसर्गमित्रचे अनिल चौगुले यांनी तृणधान्य व घनकचरा व्यवस्थापनाची माहिती उपस्थित महिलांना स्लाईड शोद्वारे दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक मदन ठाणेकर यांनी तर सुत्रसंचालन सरिता सुतार यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे केशभूषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पाकृती स्पर्धा नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचबरोबर महापालिकेच्या महिला अधिकारी व कर्मचा-यांनी वैयक्तिक डांन्स, ग्रुप डान्स सादर करुन अपल्या विविध कला गुणांचे सादरीकरण केले. यामध्ये महिला अधिकारी व कर्मचा-यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.
यावेळी केशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मानसी पाटील, द्वितीय क्रमांक नीता आधव व तृतीय क्रमांक नंदा जाधव यांनी पटकाविला. तर रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राजक्ता चौगुले (जागतिक महिला दिवस), द्वितीय क्रमांक कविता कळवट (तृणधान्य) व तृतीय क्रमांक गिता कांबळ (ती तलवार) यांनी पटकाविला. पाककृती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रोहिणी कांबळे (थालीपीठ), द्वितीय क्रमांक तेजश्री शिंदे (नाचणी लाडू) व तृतीय क्रमांक गीता कांबळे (गीता कांबळे) यांनी पटकाविला तसेच नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सुजाता पंडीत (घर मोरे परदेसीया), द्वितीय क्रमांक आर्या कांबळे (लावणी) व तृतीय क्रमांक कविता कळवट (पुष्पा, वेड) यांनी पटकाविला. या सर्वांना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे व उप-आयुक्त शिल्पा दरेकर यांनी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. त्याचबरोबर यशवंतराव चव्हसण महाविद्यालयामधील मुलींनी विविध क्रिडा स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्य स्पर्धेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेबद्दल यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या तृप्ती गुरव, काजल दिंडे, वैष्णवी पाटील, रिना परीट, रिध्दी राजाध्यक्ष यांना ट्रॅकसुट, गौरवचिन्ह व प्रसस्तीपत्र देवून गौरवण्यात आला. त्याचबरोबर राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थीनींनी शालेय लोकशिक्षण विभागातर्फे आयोजीत लोकनृत्य स्पर्धेत, बुध्दीबळ स्पर्धेत, रायफल शुटींग स्पर्धेत जलतरण स्पर्धेत तृतीय क्रमांक व कराटे स्पर्धेत रौप्य पदक पटकाविलेबद्दल सृष्टी जाधव, रिया देसाई, समीक्षा खाडे, दिप्ती खाडे, प्रांजल रथकाडे, श्रेया कंबळे, समीक्षा पाटील, वैष्णवी काळे, सृष्टी जाधव, प्रेरणा चौगले, दिप्ती खाडे यांचा गौरवचिन्ह, प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वरिष्ठ लेखापरिक्षक वर्षा परीट, कामगार अधिकारी तजश्री शिंदे, महिला व बालकल्याणच्या अधिक्षक प्रिती घाटोळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.मंजूश्री रोहीदास, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या मुख्याध्यापिका अंजली जाधव, सहा.अधिक्षक गीता कारेकर व महिला कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.