no images were found
महिला दिन आणि आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष हा एक सुरेख संगम : ऋषी आयुक्त सुनील चव्हाण
पुणे : आंतरराष्ट्रीय महिला दिनाने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष हा एक सुरेख संगम असून या निमित्ताने राज्यातील सर्व माता भगिनी आणि महिलांनी आपल्या कुटुंबाचे आरोग्य निरोगी ठेवावे असे आवाहन राज्याचे ऋषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून राज्य ऋषी आयुक्तालय व विभागीय माहिती कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीमध्ये प्रवेशद्वारात सर्व महिला अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान स्वागत सोहळा संपन्न झाला, याविषयी बोलत होते. या कार्यक्रमास मुख्य अभियंता अतुल चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे, कृषी विस्तार प्रशिक्षण संचालक विकास पाटील, कृषी संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण दिलीप झेंडे, माहिती उपसंचालक डॉक्टर पुरुषोत्तम पाटोदकर, पर्यटन विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर किरण मोघे आदी उपस्थित होते कृषी आयुक्त श्री चव्हाण यांनी प्रारंभीर महिला दिनानिमित्त मध्यवर्ती इमारतीमध्ये कार्यरत असलेल्या सर्व महिला अधिकारी कर्मचारी यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन स्वागत केले. थोडे बोलताना ते म्हणाले की तंत्रज्ञान या संकल्पनेवर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून सर्व महिलांना डिजिटल साक्षर करण्यासह त्यांच्या सर्व समाज कामे करणे अपेक्षित आहे.