Home धार्मिक व्यापाऱ्यांवर अन्याय होवू न देता श्री अंबाबाई मंदिर परिसरातील कामांचे नियोजन करा – राजेश क्षीरसागर

व्यापाऱ्यांवर अन्याय होवू न देता श्री अंबाबाई मंदिर परिसरातील कामांचे नियोजन करा – राजेश क्षीरसागर

0 second read
0
0
102

no images were found

व्यापाऱ्यांवर अन्याय होवू न देता श्री अंबाबाई मंदिर परिसरातील कामांचे नियोजन करा – राजेश क्षीरसागर

विकास कामांसाठी शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करा

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विकास कामांचे नियोजन करताना शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करावा. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून कामांचे नियोजन करा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केल्या.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यकारी अध्यक्ष श्री. क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, विशेष भूसंपादन अधिकारी शक्ती कदम, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. क्षीरसागर म्हणाले, तिरुपती, श्री सिद्धिविनायक, शिर्डी या देवस्थानांच्या धर्तीवर अंबाबाई मंदिर परिसराचा विकास व्हायला हवा. मात्र हा विकास साधताना स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही, त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊनच कामांचे नियोजन करावे. सुरुवातीला शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांची तपासणी करुन विकासासाठी ताब्यात घ्याव्यात, उर्वरित कामांसाठी गरज भासल्यासच खासगी जागांचा विचार व्हावा, असे स्पष्ट करुन याविषयी व्यापारी, स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. आवश्यकतेनुसार राज्यस्तरावर बैठकीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
श्री अंबाबाई मंदिर परिसरात धार्मिक कार्य, भाविकांसाठी पिण्याचे पाणी, अन्नछत्र, निवास व्यवस्था, स्वच्छतागृह, माहिती केंद्र आदी सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…