no images were found
तेजस्वी गुरू आणि शुक्र यांची युती पाहता येणार २ मार्चपर्यंत
कोल्हापूर : पश्चिम आकाशातील खगोलीय घटना. चंद्राच्या खाली असणारी चांदणी म्हणजे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू हा आहे,तर त्याच्या खाली असणारी तेजस्वी चांदणी म्हणजे शुक्र हा ग्रह आहे.आज पासून रोज गुरू आणि शुक्र या दोन ग्रहांचे स्थान आकाशात एकमेकांच्या खूप जवळ आलेल्या दिसणार आहेत २ मार्च पर्यंत रोज सायंकाळी ७.१५ ते ७.४५ या वेळेत पाहता येणार आहे. याबाबतची माहिती चिपळूण येथील तारांगण ग्रुपचे दिपक अंबवकर यांनी दिली.
गुरू आणि शुक्र ग्रहांची युती
१आणि २ मार्चला होणार आहे. म्हणजे या दोन चांदण्या आकाशात एकमेकांच्या खूप जवळ आलेल्या दिसणार आहेत.अशी खगोलीय घटना पुन्हा २४ वर्षांनी म्हणजेच २०४७ साली दिसणार आहे. गुरू हा ग्रह दररोज एक एक अंशाने शुक्राच्या जवळ येणार आहे. आणि १ व २ मार्चला यांच्या मधील अंतर सर्वात कमी झालेले दिसेल. १ मार्चला शुक्राच्या वर दिसणारी चांदणी 2 मार्चला शुक्राच्या खाली दिसेल.यांच्या स्थानात होणारा बदल, ते एकमेकांच्या कसे जवळ येत आहेत या खगोलीय घटनेचा आनंद अनुभवायचा असेल तर आज पासूनच रोज फक्त न विसरता पाच मिनिटे वेळ काढून पाहावे असे आवाहन दीपक आंबवकर यांनी केले आहे.