no images were found
सुमंगलम महोत्सवातच कणेरी मठावरील ६० गायी मृत्यूमुखी
कोल्हापूर : श्री सिद्धगिरी कणेरी मठावर सुरू असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव ऐन भरत आला असताना तब्बल ६०च्या वर गायी अचानक मृत्यूमुखी पडण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर अजूनही ३०च्या वर गायीची प्रकृती चिंताजनक आहे.
गाईंच्या अचानक मृत्यूच्या वृत्ताला पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त पठाण यांनी दुजोरा दिला असून मृत गाईंचे पोस्टमार्टम करून फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रासह अनेक राज्यातील राजकीय नेते, मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि साधुसंतांच्या उपस्थितीत 20 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या महोत्सवात देशी गाई पालन आणि प्रदर्शन हा देखील एक महत्त्वाचा भाग होता. पण महोत्सव ऐन भरात आला असताना तब्बल ६० च्यावर गायी अचानक मृत्युमुखी पडल्या. तर काही अत्यावस्थ आहेत.
महोत्सवासाठी परिसरातून आलेल्या भाकऱ्या आणि लोकांसाठी केलेले जेवण शिल्लक राहिल्यानंतर या गाईंना अति प्रमाणात खायला दिल्याने हा प्रकार घडला आहे का? याशिवाय गाईंच्या मृत्यूची इतर कारणे ही तपासण्यात येत आहे. अद्याप याबाबत मठ व्यवस्थापन किंवा महोत्सव समितीकडून कोणताही खुलासा आलेला नाही.