no images were found
इस्लामपुरात एकाने चूक केली; पोलिसांनी सर्व टपरी चालकांना दिली अजब शिक्षा
सांगली : कामेरी नाका येथील ट्रॅफिक सिग्नलची व्यवस्था आठवड्यात दोन वेळा खंडित झाली. याची पाहणी केली असता एका टपरीचालकाने ट्रॅफिक सिग्नल व्यवस्थेची तार तोडल्याचे निदर्शनात आले. या टपरीचालकाची टपरी हटवण्यात आली. पण इस्लामपूर पोलिसांनी एका टपरी चालकाने केलेल्या चुकीची अजब दिली शिक्षा त्या परिसरातील सर्वच टपरी चालकाना दिली आहे. हा शिक्षेचा प्रकार थांबवावा अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख सागर मलगुंडे यांनी केली आहे.
आठवड्याभरापूर्वी कामेरी नाका येथील ट्रॅफिक सिग्नलची व्यवस्था आठवड्यात दोन वेळा खंडित झाली. याची पाहणी केली असता एका टपरीचालकाने ट्रॅफिक सिग्नल व्यवस्थेची तार तोडल्याचे निदर्शनात आले. कामेरी नाका येथील ट्रॅफिक सिग्नल व्यवस्थेच्या तारा तोडण्याविरुद्ध नगरपालिका प्रशासनाने इस्लामपूर पोलिसांकडे तक्रार दिली होती. याप्रकरणी शहा नामक व्यक्तीवर इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या व्यक्तीची पानपट्टी चौकातून हटवण्यात आली आहे.
एका टपरी चालकाने केलेल्या कृत्याची शिक्षा सर्वांना मिळाली आहे. ट्रॅफिक सिग्नलवर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा अजब फतवा पोलीस प्रशासनाने परिसरातील टपरी धारकांना दिला आहे. सर्वच टपरीधारकांना भरउन्हात हातात काठी घेवून उभे रहावे लागत आहे. चूक एकाची आणि शिक्षा सर्व टपरीधारकांना का? असा सवाल उपस्थित होत आहे. तोंड दाबून बुक्कयांचा मार सहन करीत टपरीचालकही पोलिसांच्या आदेशाला विरोध करुन कायमचा पोटावर पाय येण्यापेक्षा एक दिवस वाहतूक व्यवस्थेसाठी भरउन्हात उभा राहून स्वतःची सुटका करताना दिसत आहे. पण वाहतूक व्यवस्थित करताना टपरीधारकांना काही इजा पोचली तर त्याला जबाबदार कोण? पोलिस अशा प्रकारे शिक्षा देऊ शकतात का? त्यना जाब कोण विचारणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत.