
no images were found
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सर्वांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे – जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण
कोल्हापूर : भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर साजरा करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये अमृत महोत्सव साजरा होत आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिक व शहीद जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीमध्ये विधवांच्या हस्ते देखील ध्वजारोहण करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सुद्धा माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांचे वडील यांच्याहस्ते १३, १४ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सर्वांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे.