Home मनोरंजन १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार ‘टकाटक २’

१८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार ‘टकाटक २’

0 second read
0
0
105

no images were found

१८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार ‘टकाटक २’

मुंबई : बॅाक्स ऑफिसवर मिळवलेलं यश आणि प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेल्या स्थानाच्या बळावर ‘टकाटक’ चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हसत-खेळत प्रेक्षकांपर्यंत संवेदनशील विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘टकाटक’चा पुढील भाग ‘टकाटक २’ या नावाने १८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. अॅडल्ट कॅामेडी या प्रकारात मोडणारा हा चित्रपट तरुणाईचं त्यांच्या भाषेत मनोरंजन करणारा आहेच, इतर वयोगटातील प्रेक्षकांनाही काही ना काही देणारा आहे. टिझर, मोशन पोस्टर आणि गाण्यांच्या माध्यमातून दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘टकाटक २’नं प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण करण्याचं काम केलं आहे. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. १८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…