Home क्राईम विषप्राशन करुन शिंदे गटाच्या नेत्याच्या पत्नीने केली आत्महत्या

विषप्राशन करुन शिंदे गटाच्या नेत्याच्या पत्नीने केली आत्महत्या

8 second read
0
0
308

no images were found

विषप्राशन करुन शिंदे गटाच्या नेत्याच्या पत्नीने केली आत्महत्या

           मनसेतून शिंदे गटात दमदार एन्ट्री घेतलेले नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने राहत्या घरात आत्महत्या केली आहे. विष प्राशन करुन त्यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अजूनही समोर आलं नाही आहे. मात्र पत्नीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे. बुधवारी राहत्या घरात पत्नीने विष प्राशन केलं होतं. त्यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण गुरुवारी दुर्दैवाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निलेश माझिरे यांना काही दिवसांपूर्वीच मनसेतून शिंदे गटात प्रवेश घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांनी शिंदे गटात एन्ट्री घेतली होती. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे कोल्हापूर, (प्र…