
no images were found
वाळवीनंतर शिवानीचे हे सिनेमा येणार भेटीला
2023 ची सुरुवात वाळवी नावाच्या कमाल सिनेमाने झाली, हा सिनेमा तर आवडतो आहेच, पण यात अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या भूमिकेचंही कौतुक होतंय. आपल्याला हवं ते साध्य करणारी, त्यासाठी काहीही करायला तयार असलेल्या मुलीच्या व्यक्तिरेखेत शिवानी यात दिसून येत आहे. सुंदर लूक्स आणि सहज अभिनय हे कॉम्बिनेशन या निमीत्ताने पाहायला मिळत आहे.
वर्षाची सुरुवात इतकी चांगली झाल्यानंतर यंदा शिवानीकडून चाहत्यांना आणखी वेगवेगळ्या सिनेमांची भेट मिळणार आहे. त्या बद्दल शिवानी म्हणते , ‘’2022 हे वर्ष खूप बिझी गेलं. 2-3 चित्रपटांचं शूटिंग मी केलं. तर आता हे नवीन वर्ष माझ्यासाठी नवनवीन संधीचं वर्ष आहे असं मी समजते. कारण गेल्या दोन वर्षात जी मी कामं केली होती, ती आता प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या प्रत्येक सिेनेमात मी वेगवेगळ्या भूमिका करायला मिळाल्याचं समाधान आहे.
आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफेमध्ये शिवानी आत्तापर्यत न दिसलेल्या भूमिकेत आहे. शिवानी यात नक्षलवाद्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे. यासाठी शिवानीने खडतर मेहनत घेतली आहे. याबद्दल शिवानी म्हणते,’’ कन्नड शिकणं असेल किंवा फिजीकल ट्रेनिंग या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. यामुळे या सिनेमासाठी मी सर्वतोपरी माझ्या कम्फर्टझोनच्या बाहेर काम केलं आहे.’’
त्याशिवाय महेश मांजेकर यांच्या वीर दौडले सात या सिनेमात ऐतिहासीक भूमिका साकारत आहे. शिवानीसाठी ऐतिहासीक भूमिका पहिलीच असणार आहे. त्या शिवाय शिवानीचे आणखी दोन सिनेमा येत आहेत, त्याबद्दल लवकरच कळेल. एकूणंच शिवानीला अभिनयाचे विविध पैलू दाखवण्याची संधी या सिनेमांमधून मिळाली आहे आणि शिवानीच्या फॅन्सनाही तिच्या या भूमिकांची ट्रीट मिळणार आहे हे नक्की. या शिवाय शिवानीला चित्रपट, वेबसिरीजमधून विविध भूमिका करायच्या आहेत.