
no images were found
न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नवोदित विद्यार्थांचे उत्साहात स्वागत
आयुर्वेदिक संसोधनावर विद्यार्थांनी भर देण्याची गरज-डी. जी. गुणे
कोल्हापूर: श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, संचालित न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नवोदित विद्यार्थांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला.
या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डी. जी. गुणे(व्यवस्थापकीय संचालक, एस.जी. फायटो फार्मा. प्रा. लि.) यांची उपस्थिती होती.
यावेळी श्री. गुणे यांनी मार्गदर्शन करताना बदललेली जीवनशैली दैनंदिन सवयी यासाठी दैनंदिन जीवनामध्ये वावरताना संतुलित आहार,योग्य दिनचर्या व आयुर्वेदाचा पुरेपूर वापर करण्याची गरज असल्याचे नमूद केले. याबरोबरच फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी आयुर्वेद संशोधनावर भर दिला पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वालन व छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. बी.जी.बोराडे, तसेच कार्यक्रमास चेअरमन श्री. के.बी. पाटील, व्हा. चेअरमन श्री. डी. जी. किल्लेदार, खजानिस श्री. य्हाय. एस. चव्हाण व संस्थेच्या सर्व पधाधिकार्यांची उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष. बोराडे सर यांनी विध्यार्थांना मार्गदर्शन केले व संस्था सोयी-सुविधा पुरविण्यास कोठेच कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली. चेअरमन श्री. के.जी. पाटील यांनी लवकरच संस्थेचे बी फार्मसी सुरु करण्यात येईल असे सांगितले व विद्यार्थांना सुभेछ्या दिल्या. व्हा. चेअरमन डी. जी. किल्लेदार यांनी देखील विद्यार्थांना मार्गदर्शन केले. यावेळी खजानिस. व्हा. एस. चव्हाण यांनी विध्यार्थाना शुभेछ्या दिल्या.
कार्याक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे विकास आधिकारी डॉ. संजय दाभोळे यांनी संस्थेचा मागोवा घेतला. व विध्यार्थांनी उच्च शिक्षणाबरोबरच फार्मसीमधील विविध करीअरच्या संधीचा लाभ घेतला पाहिजे असे सांगितले
कार्यक्रमांचे प्रास्थाविक कॉलेजचे प्राचार्य. डॉ. रवींद्र भैरव कुंभार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. सचिन पिशवीकर यांनी केले. सूत्रसंचालन कु. पियुषा नेजदार यांनी केल. तर कार्यक्रमाचे नेटके नियोजन वर्गशिक्षक श्री. सुजित साळोखे, ग्रंथपाल सौ. वर्षा शिंदे, सौ. सीमा साळुंखे, श्री. अर्जुन चौगले यांनी केले. आभार कु. अंजली पाटील या विध्यार्थिनीने मानले.