no images were found
१२ कोटीचा रेडा आणि ३१ लिटर दूध देणारी म्हैस भीमा कृषी प्रदर्शनचे खास आकर्षण
कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी आयोजित करण्यात येत असलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे भीमा कृषी प्रदर्शन २०२३ हे येत्या २६ ते २९ जानेवारी २०२३ या चार दिवसाच्या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. येथील मेरी वेदर मैदान येथे भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असून तीन वेळा नॅशनल चॅम्पियन मिळविणारा जगातील सर्वात मोठा हरियाणातील १२ कोटीचा बादशहा नावाचा रेडा आणि ३१ लिटर दूध देणारी बिजली नावाची म्हैस प्रदर्शनाची खास आकर्षण असणार आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केलेल्या मिलेटचे (तृणधान्य) याचे स्वतंत्र दालन असणार आहे.
प्रथम मिलेटिइयरमध्ये ४० स्टॉल असणार आहेत. शिवाय जे.आय मानांकन असणारे पदार्थ पहायला मिळणार आहेत.
केळीच्या बुध्दांपासून पदार्थ बनविणारी गुजरात मधील कंपनी रेशीम कोष याची माहिती मिळणार आहे. हायड्रोफोनिक चारा असणार आहे.मोती संवर्धन स्वीट वॉटरचा उपयोग करून अनेक मोती घरात बनविलेले आहेत. हे सर्व कृषी प्रदर्शनात पहावयास मिळणार आहे. अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रदर्शनाचे उदघाटन २६ जानेवारीस दुपारी ४ वाजता कोल्हापूरचे पालकमंत्री दिपक केसरकर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तर २८ रोजी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी उपस्थित असणार आहेत.
प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील विविध प्रचलित कंपन्यांचा समावेश आहे. याचबरोबर पशुपक्षी पालन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन तज्ञांची व्याख्याने आणि विविध कंपन्यांचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञान उपयुक्त माहिती देणारे हे सर्वात मोठे प्रदर्शन आहे. तरी या प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.प्रदर्शनामध्ये ४०० पेक्षा अधिक स्टॉलचा समावेश आहे.त्याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या मा. सौ अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली २०० बचत गटांना मोफत देण्यात आले आहेत.ज्याद्वारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला या ठिकाणी थेट बाजारपेठ मिळवून दिली जाणार आहे.त्यामध्ये खाद्यपदार्थ नाचणी पापड यांचा समावेश आहे.चार दिवस याठिकाणी शेतकऱ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मोफत झुणका भाकरी दिली जाणार आहे.