no images were found
रविवारी कोल्हापुरात एकदिवशीय भव्य खुल्या 1600 गुणांकनाखाली जलद बुद्धिबळ स्पर्धा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व जिद्द चेस अकॅडमी,कोल्हापूर च्या वतीने रविवारी दि. 15 जानेवारी रोजी एकदिवशीय भव्य खुल्या सोळाशे गुणांकनाखालील जलद बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापुरात आयोजित केल्या आहेत.या स्पर्धा जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्विस लीग पद्धतीने एकूण नऊ फेऱ्यात होणार आहेत.रुक्मिणी मल्टीपर्पज हॉल, बुधले हॉल जवळ,पुलाची शिरोली, हायवे लगत, कोल्हापूर या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केले आहे.रोख साठ हजार रुपयाची एकूण बक्षीसशे व आकर्षक चषक बक्षीस म्हणून ठेवली आहेत.स्पर्धा विजेत्याला रोख दहा हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.उपविजेत्यास रोख 7000 रुपये व चषक तर तृतीय क्रमांकास रोख पाच हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.अशी एकूण मुख्य 25 बक्षिसे आहेत त्या व्यतिरिक्त बिगर मानांकित व विविध गुनांकनाखालील गटात आणि उत्कृष्ट महिला,ज्येष्ठ बुद्धिबळपटू, उत्कृष्ट शाळा व विविध वयोगट बुद्धिबळपटूना उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवली आहेत.अशी एकूण 90 पेक्षा जास्त बक्षिसांची संख्या आहे.या स्पर्धेत सोळाशे गुणांकनाखालील कोणताही बुद्धिबळपटू पाचशे रुपये प्रवेश शुल्क भरुन भाग घेऊ शकतो.14 जानेवारी नाव नोंदवण्यासाठी अंतिम तारीख आहे. 15 जानेवारीला सकाळी साडेनऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार असून त्यानंतर बरोबर दहा वाजता पहिल्या फेरीस प्रारंभ होईल. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले हे मुख्य पंच आहेत त्यांना जयश्री पाटील, करण परीट, निहाल मुल्ला,तुषार शर्मा, अभिजीत चव्हाण, ऋतुराज भोकरे व सुशांत कांबळे हे सहकार्य करणार आहेत.नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा.