no images were found
‘खेडया कडे चला‘ ची पुन्हा गरज – निवृत्ती शासकीय अधिकारी चंद्रकांत दळवी
कोल्हापूर – ग्रामविकासासाठी महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या ‘खेडयाकडे चला’ या मंत्राची पुन्हा गरज निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन मा. चंद्रकात दळवी ; निवृत्त भारतीय प्रशासकीय अधिकारीध्द यांनी यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. आयोजित स्वतंत्र्याची पंच्याहत्तरी अतंर्गत ‘ग्रामीणविकासाची पंच्याहत्तरी’ या दोन दिवसीय परिसवांदाच्या उदघाटन प्रसंगी केले.
मा. चंद्रकांत दळवी म्हणाले, ग्रामीण भागात पायाभुत सुविधाची उभारणी, रस्ते, वाहतुक, संवादाची साधने, शिक्षण, अरोग्य इ. सुविधांची तातडीची गरज असुन या सुविधा उभारल्या खेरीज ग्रामविकास दृष्टीपथात येणार नाही.. ग्रामविकासाठी महत्वाचे घटक म्हणून अर्थिक आणि मानव विकास याकडे पाहिले पाहिजे तसेच ग्रामिण विकासातील अडथळे व त्यावरील उपयायोजना यावर मा. दळवी यांनी प्रकाश झोत टाकला.