Home सामाजिक कोल्हापुरात आंब्याच्या पहिल्या पेटीला तब्बल ५१,००० भाव, राज्यातील उच्चांकी दर

कोल्हापुरात आंब्याच्या पहिल्या पेटीला तब्बल ५१,००० भाव, राज्यातील उच्चांकी दर

1 second read
0
0
217

no images were found

कोल्हापुरात आंब्याच्या पहिल्या पेटीला तब्बल ५१,००० भाव, राज्यातील उच्चांकी दर

कोल्हापूर :  येथील शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच फळांचा राजा हापूस आंबा आज दाखल झाला. मुहूर्ताच्या पहिल्याच सौद्यामध्ये पाच डझनाच्या पेटीला तब्बल ५१,००० रुपयांचा भाव मिळाला आहे. राज्यातील यावर्षीचा सर्वात उच्चांकी दर हा कोल्हापुरात मिळाला आहे. पहिला सौदा अध्यक्ष खा. धनंजय महाडिक यांच्या हस्ते काढण्यात आला आहे. कोल्हापुरात साधरत: मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आंब्याची आवक सुरू होते. मात्र यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये आंब्याची आवक सुरू झाली आहे.
यंदाच्या हंगामातील पहिला आंबा कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला कुंभारमठ (ता. देवगड) येथील शेतकरी सुहास दिंदास गोवेकर यांचा हापूस आंबा आहे. याचा लिलाव आज सकाळी खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत पार पडला. ५,००० रुपयापांसून सुरू झालेला दर हा तब्बल ५१ हजार रुपयांपर्यंत पोहोचला. सदर लिलावात खा. धनंजय महाडिक यांनी देखील बोली लावत तब्बल ५१ हजार रुपयाला आंबा खरेदी केला. पाच डझनाला सुमारे ५१ हजार रुपये दर मिळाल्याने एका डझनाचा दर कमीत-कमी दहा हजार दोनशे रुपये होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊन दर आवाक्यात येण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…