no images were found
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज- ना. प्रवीण दरेकर
कुरूंदवाड : एस. पी. हायस्कूल क्रीडांगणावर मयूर उद्योग समूह, कोल्हापूर व डॉक्टर अंकल आयोजित मयूर कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना विधान परिषदेचे गटनेते दरेकर म्हणाले, नव्या युगानुसार शेतकर्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज आहे. म्हणून राज्य आणि केंद्र शासनाने शेतकर्यांसाठी विविध योजना अमलात आणल्या आहेत. या योजनांचा शेतकर्यांनी लाभ घेतल्यास शेतीत आधुनिकता निर्माण होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल.
कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी नागपूरचे महाराजा मुधोजीराजे भोसले होते. यावेळी मयूर उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, संघटक मकरंद देशपांडे, उद्योगपती अण्णासाहेब चकोते, तहसीलदार डॉ. अपर्णा धुमाळ-मोरे, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे आदी उपस्थित होते. यावेळी मुधोजीराजे भोसले यांचे भाषण झाले. डॉ. विक्रम पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. हे प्रदर्शन १0 जानेवारीपर्यंत चालणार असून ३०० पेक्षाही अधिक दालनांचा या प्रदर्शनात सहभाग असेल.