
no images were found
माजी पोप बेनेडिक्ट सोळावे यांचे निधन
व्हॅटिकन सिटी : माजी पोप बेनेडिक्ट सोळावे यांचे ३१ डिसेंबर रोजी व्हॅटिकन सिटीमध्ये निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. माजी पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी २००५ ते २०१३ पर्यंत अपोस्टोलिक सी आयोजित केली होती. मात्र, २०१३ मध्ये काही कारणास्तव बेनिडिक्ट सोळावे यांनी पोप पद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. गेल्या काही दिवसांपासून बेनिडिक्ट यांचा मुक्काम व्हॅटिकन गार्डन्समधील एका लहान मठातील मेटर एक्लेसियामध्ये होता. व्हॅटिकन चर्चच्या प्रवक्त्यांकडून याबाबत एक निवेदन जाहीर करण्यात आले आहे. ज्यात माजी पोप बेनेडिक्ट सोळावे यांचे व्हॅटिकनमधील मेटर एक्लेसिया मठात सकाळी ९:३४ वाजता निधन झाल्याचे म्हटले आहे.